बँक कर्मचाऱ्यांच्या संपाने कोट्यवधीचे व्यवहार ठप्प ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:30 AM2021-03-16T04:30:31+5:302021-03-16T04:30:31+5:30

शासनाने सर्व शासकीय योजनांना विकण्याचे काम बंद करावे, बँकांचे खासगीकरण करू नये, बँकेत कर्मचाऱ्यांची नवीन भरती सुरू करावी आदी ...

Billions of transactions halted due to bank strike | बँक कर्मचाऱ्यांच्या संपाने कोट्यवधीचे व्यवहार ठप्प ()

बँक कर्मचाऱ्यांच्या संपाने कोट्यवधीचे व्यवहार ठप्प ()

googlenewsNext

शासनाने सर्व शासकीय योजनांना विकण्याचे काम बंद करावे, बँकांचे खासगीकरण करू नये, बँकेत कर्मचाऱ्यांची नवीन भरती सुरू करावी आदी अनेक मागण्यांना घेऊन हा संप पुकारण्यात आला आहे. हा संप सामान्य जनतेच्या हितासाठी आहे. सद्यस्थितीत वाढता कोरोना संसर्ग बघता कोणत्याही प्रकारचे धरणे किंवा नारेबाजी करण्यात आली नाही. संपात सर्व कर्मचारी सहभागी होऊन व्हाॅट्सॲप, फेसबुक तथा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला विरोध करीत आहेत. बँकेच्या संपादरम्यान नेट बँकिंगची सुविधा सुरू राहणार आहे. यात मोबाईल बँकिंगची सुविधा, एटीएम व ग्राहक सेवा केंद्र सुरू आहेत.

....

कर्मचाऱ्यांना मिळाली चार दिवसाची रजा

बँक कर्मचाऱ्यांचा संप १५ व १६ मार्च रोजी असल्याने शनिवार, रविवार, सोमवार व मंगळवार अशा चार दिवसांची रजा बँक कर्मचाऱ्यांना मिळाली आहे. गोंदिया जिल्ह्यात अधिक प्रमाणात राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जिल्ह्याच्या बाहेरील कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे ते चार दिवसांच्या रजेवर गेले आहेत.

Web Title: Billions of transactions halted due to bank strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.