बिरसा मुंडा यांचे कार्य अविस्मरणीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 10:19 PM2018-01-22T22:19:00+5:302018-01-22T22:19:36+5:30
आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी बिरसा मुंडा यांनी जीवन अर्पण केले असून ते प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यांची तुलना करता येत नाही.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी बिरसा मुंडा यांनी जीवन अर्पण केले असून ते प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यांची तुलना करता येत नाही. बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला जागृत करण्याचे कार्य करून विकासाच्या प्रवाहात आणले. त्यांचे हे कार्य अविस्मरणीय असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम पांगडी येथे बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, कॉंग्रेस कमिटी महासचिव सहसराम कोरोटे प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार अग्रवाल यांनी, आदिवासी समाजाच्या विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगत समाजाच्या विकासासाठी विधान भवनात कितीही संघर्ष करावा लागला तरीही करणार असल्याचे आश्वासन दिले.
दरम्यान आमदार अग्रवाल यांच्यासह उपस्थित अन्य पाहुण्यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची विधीवत पूजा करून अनावरण करण्यात आले. याप्रसंगी मध्य प्रदेश राज्यातील अशोक मडावी यांनी गोंडी संस्कृतीवर आधारित कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाला बल्लुसिंह नागभिरे, दयालसिंग उईके, ज्ञानीराम वट्टी, किशन उईके, सुनील मरसकोल्हे, विनोद भलावी, डी.बी.बोरकर, अरूण साबळे, स्वप्नील ढोले, शिला जाधव, मनोहर उईके, डि.आर.अगडे, मिना सयाम, दिगंबर बघेले, नामदेव शहारे, एस.आर. निंबार्ते, व्ही.के.अहीर, आर.बी. बाचकलवार, व्ही.आर. मडावी, डॉ. घनशाम पाचे, डॉ.किर्तीकुमार चुलपार, नरेंद्र शेंडे यांच्यासह मोठ्या संख्येत आदिवासी बांधव उपस्थित होते.