बिरसी प्रकल्पग्रस्तांना मिळणार मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:14 AM2018-01-07T00:14:13+5:302018-01-07T00:14:34+5:30

तालुक्यातील बिरसी येथील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेज अतंर्गत आर्थिक मोबदला पंधरा दिवसात वाटप केला जाणार आहे. यासाठी २१ कोटी रुपयांचा निधी उपविभागीय कार्यालयाला प्राप्त झाला आहे.

 Birsi project affected people get compensation | बिरसी प्रकल्पग्रस्तांना मिळणार मोबदला

बिरसी प्रकल्पग्रस्तांना मिळणार मोबदला

Next
ठळक मुद्दे२१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध : १५ दिवसात होणार वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील बिरसी येथील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेज अतंर्गत आर्थिक मोबदला पंधरा दिवसात वाटप केला जाणार आहे. यासाठी २१ कोटी रुपयांचा निधी उपविभागीय कार्यालयाला प्राप्त झाला आहे.
बिरसी येथील विमानतळामुळे प्रकल्पबाधीेत झालेल्या प्रकल्पग्रस्तांना मागील आठ दहा वर्षांपासून भारतीय विमान प्राधिकरणाकडून आर्थिक मोबदला मिळाला नव्हता. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आर्थिक संकटात सापडले होते. विमान प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाकडे वांरवार पाठपुरावा करुन सुध्दा प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. याची दखल घेत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेज अंतर्गत निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत होते. यासाठी त्यांनी भारतीय विमान प्राधिकरण आणि संबंधित विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेवून प्रकल्पग्रस्तांना निधीे उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले होते. त्याचीच दखल घेत प्राधिकरणाने २१ कोटी रुपयांचा निधी उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्याकडे उपलब्ध करुन दिला आहे. प्राप्त झालेल्या निधीचे शेतकºयांना त्वरीत वाटप सुरू करण्याचे निर्देश आ.अग्रवाल यांनी दिले आहे. उपविभागीय अधिकारी वालस्कर यांनी सांगितले की प्रकल्पग्रस्तांची यादी प्रकाशीत करुन त्यावर आक्षेप मागविले होते. पुढील आठवड्यात अंतीम यादी प्रकाशीत करुन प्रकल्पग्रस्तांना निधीचे वाटप करण्यात येणार असल्याचे वालस्कर यांनी सांगितले. आ.अग्रवाल यांच्या प्रयत्नाने प्रकल्पग्रस्तांसाठी निधी उपलब्ध झाल्याने मागील आठ दहा वर्षांपासून प्रलबिंत असलेला प्रश्न मार्गी लागला आहे. विशेष म्हणजे आ.अग्रवाल यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री अशोक गजपती राजू यांची भेट घेवून प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेज अतंर्गत निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा २१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला.

Web Title:  Birsi project affected people get compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.