भरवस्तीत रानगव्याचा धुमाकुळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 10:33 PM2019-08-27T22:33:31+5:302019-08-27T22:33:51+5:30
मंगळवारी सकाळच्या सुमारास सालईटोला रस्त्याच्या दिशेने शेंडा गावाकडे एक रानगवा येत असल्याचे काही गावकऱ्यांनी बघितले. एवढ्यातच कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला.रानगवा ईकडे-तिकडे न भटकता सरळ डांबरीकरण मार्गाने गावात प्रवेश करुन अनेक लोकांच्या घरात शिरला.त्यामुळे गावकऱ्यांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथे मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास एका रानगव्याने धुमाकुळ घातल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रानगव्याने काही नागरिकांच्या घरात घुसून धुमाकुळ घातला मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी अथवा ईजा झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार मंगळवारी सकाळच्या सुमारास सालईटोला रस्त्याच्या दिशेने शेंडा गावाकडे एक रानगवा येत असल्याचे काही गावकऱ्यांनी बघितले. एवढ्यातच कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला.रानगवा ईकडे-तिकडे न भटकता सरळ डांबरीकरण मार्गाने गावात प्रवेश करुन अनेक लोकांच्या घरात शिरला.त्यामुळे गावकऱ्यांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळताच शेंडा बिटचे वन क्षेत्र सहाय्यक शैलेश पारधी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. गावात धुमाकुळ घालणाऱ्या रानगव्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केले. अखेर तीन ते चार तासाच्या परिश्रमानंतर रानगव्याला पकडण्यात वन विभागाच्या कर्मचाºयांना यश आले. हा सर्व प्रकार बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. शेंडा गावाचा परिसर जंगलव्याप्त असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात अनेकदा गावाकडे धाव घेतात. मात्र रानगवा भरवस्तीत शिरल्याची घटना पहिल्यांदाच घडली.सदर रानगव्याला जंगलाच्या दिशेने पळविण्यासाठी वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक शैलेश पारधी,वनरक्षक व्ही.पी.बडोले, एन.एस.पातोळे, डी.डी.माहुरे, वनमजूर एन.आर.मेंढे, वाय.एस.ईळपाते यांनी प्रयत्न केले.