भाजपची बुलेट ट्रेन विकासात अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2017 02:06 AM2017-06-10T02:06:02+5:302017-06-10T02:06:02+5:30

आज पंडीत दीनदयाल उपाध्याय सारख्या समर्पित नेत्यांमुळेच आमचा पक्ष निती व विचारांमुळे लोक व कार्यकर्ते जुळून आहेत.

The BJP is ahead in the development of the bullet train | भाजपची बुलेट ट्रेन विकासात अग्रेसर

भाजपची बुलेट ट्रेन विकासात अग्रेसर

Next

आशिष वांदिले : शहर विस्तारक बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आज पंडीत दीनदयाल उपाध्याय सारख्या समर्पित नेत्यांमुळेच आमचा पक्ष निती व विचारांमुळे लोक व कार्यकर्ते जुळून आहेत. तेच कार्यकर्ते आज देशात व केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या झेंड्या खाली शासन चालवित आहेत. भाजपची बुलेट ट्रेन विकासासाठी अग्रेसर असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा संघटन मंत्री आशिष वांदीले यांनी केले.
येथील राईस मिलर्स असोसिएशनच्या सभागृहात आयोजीत शहराच्या १५ दिवसीय विस्तारक कार्यशाळा बैठकीत विस्तारक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष सुनिल केलनका, प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, महामंत्री भाऊराव उके, संजय कुलकर्णी, भरत क्षत्रीय, जयंत शुक्ला, चंद्रभान तरोण, पंकज सोनवाने उपस्थित होते.
बैठकीत आलेल्या सर्व प्रभागातील नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वांदिले यांनी, विस्तारक कार्यशाला केंद्र व राज्याच्या योजनांवर शासनाच्या कामांची जनतेला माहिती दिलीे. जनसंवाद व पुस्तक, स्टिकर, पत्रांच्या माध्यमातून शासन त्यांच्यासाठी काय करीत आहे याची माहिती आम्हाला द्यायची आहे. यासाठी आम्हाला घरोघरी जाऊन शासनाच्या योजनांची माहिती द्यायची असल्याचे सांगीतले.
माजी जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांनी, प्रत्येक विस्तारकाने आपल्या पंचायत समिती क्षेत्रांतर्गत येणाऱ्या बूथवर सकाळी ६.३० ते ९ वाजता पर्यंत घरोघरी जाऊन साहीत्य वितरीत करून जनसंवाद करावयाचे आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सायंकाळी आमंत्रीत करावयाचे आहे. प्रत्येक बूथवर बूथ समिती, युवा समिती, महिला समित्यांच्या मतदारांसह अनेक समित्यांचे गठन करण्यावर लक्ष देण्यास सांगितले.

 

Web Title: The BJP is ahead in the development of the bullet train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.