तिरोडाच्या कृउबास वर भाजपचे वर्चस्व
By Admin | Published: May 23, 2017 12:51 AM2017-05-23T00:51:15+5:302017-05-23T00:51:15+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडाच्या निवडणुकीचा आज सोमवारी २२ मेला निकाल लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडाच्या निवडणुकीचा आज सोमवारी २२ मेला निकाल लागला. त्यात भाजपा समर्थित सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला. आ. विजय रहांगडाले यांच्या पुढाकारने जल्लोष रॅली काढण्यात आली.
सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत ओमप्रकाश राधेलाल पटले ३६१, चिंतामन प्रभूदास रहांगडाले ३५९, तेजराम सुरजलाल चव्हाण ३५०, चर्तुभूज सेजे, बिसेन ३२३, भुमेश्वर यशवंतराव रहांगडाले ३१८, दीपक प्रेमलाल पटले २९४, विजय कारु डिंकवार २७०, प्रतिभा सुभाष जैतवार ४८२, प्रभा कवडू घरजारे ४३५, इतर मागासवर्गीय गटातून श्रावण आसाराम रहांगडाले २९९, विमुक्त जाती/भटक्या जमाती गटातून दिनेश मिताराम चोभरे ४१५, ग्राम पंचायत गटातून घनश्याम पूनाजी पारधी ३४६, जितेंद्र (पिंटू) तेजराम रहांगडाले ३४१, ग्रामपंचायत अनु. जाती/जमाती गटातून मिलींद प्रेमलाल कुंभरे ३६२, ग्राम पंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक गटातून तिरुपती हेमराज राणे ३६२, व्यापारी/अडते गटातून जयप्रकाश शंकर गौतम ८३, हमाल/तोलारी/रेजा गटातून कमलेश शांताराम मलेवार ११५, विपणन व प्रक्रिया गटातून ३४ मते वैध असून राजकुमार केशरवाणी १७ व ओंकार लांजेवार १७ समान मतदान पटल्याने ईश्वर चिठ्ठीने राजकुमार केशरवाणी विजयी ठरले. विजयी उमेदवार, भाजपा कार्यकर्ते व समर्थकांनी जल्लोष केला. बॅड डिजेच्या तालावर गुलाल उधळले. यावेळी उमाकांत हारोडे, डॉ. वसंत भगत, संजयसिंह बैस, न.प.सदस्य राजेश गुणेरिया, सुनिल बंसोड, देवेंद्र तिवारी, स्वानंद पारधी, प्रकाश भोंगाडे उपस्थित होते.