सभापती पदावर भाजपचे वर्चस्व

By admin | Published: February 20, 2017 12:52 AM2017-02-20T00:52:54+5:302017-02-20T00:52:54+5:30

स्थानिक नगर परिषदेवर जनतेमधून भाजपच्या सोनाली अमृत देशपांडे यांची निवड झाली ...

BJP dominates in the post of Chairman | सभापती पदावर भाजपचे वर्चस्व

सभापती पदावर भाजपचे वर्चस्व

Next

शिवसेना : स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक रक्षण, भाजप : बांधकाम, महिला व बालकल्याण, राष्ट्रवादी : शिक्षण
तिरोडा : स्थानिक नगर परिषदेवर जनतेमधून भाजपच्या सोनाली अमृत देशपांडे यांची निवड झाली तर उपाध्यक्ष पदावर भाजप-सेवा युतीच्या वतीने शिवसेनेचे सुनील पालांदूरकर यांची निवड नगर परिषदेच्या सदस्यांकडून बहुमताने करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या नगर परिषद सभापती पदाच्या निवडणुकीत बांधकाम सभापती भाजपाचे अशोक असाटी, शिक्षण सभापती राष्ट्रवादीचे नरेश कुंभारे, स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक रक्षण समिती सभापती शिवसेनेचे सुनील पालांदूर, महिला व बालकल्याण सभापती भाजपाच्या श्वेता मानकर यांची निवड करण्यात आली. सभापती पदासाठी प्रत्येकी एकच फार्म आल्याने सर्वानुमते निवड झाल्याचे समजते.
स्थायी समितीमध्ये अध्यक्ष सोनाली देशपांडे, सदस्य सुनील पालांदूरकर, अशोक असाटी, नरेश कुंभारे, श्वेता मानकर यांचा समावेश करण्यात आला. बांधकाम समितीमध्ये सभापती अशोक असाटी, सदस्य अजयसिंह गौर, प्रभू असाटी, अनिता अरोरा, संतोष मोहने यांचा समावेश आहे. शिक्षण समितीमध्ये सभापती नरेश कुंभारे, सदस्य ममता हट्टेवार, सोनाली श्रीराम, राखी गुणेरीया, भावना चवळे यांचा समावेश झाला. स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक रक्षणसमितीमध्ये सभापती सुनील पालांदूरकर, सदस्य जगदीश कटरे, द्वारका भोंडेकर, भावना चवळे, विजय बन्सोड यांचा समावेश आहे. महिला व बालकल्याण समितीमध्ये सभापती श्वेता मानकर, सदस्या रश्मी बुराडे, किरण डहाटे, राखी गुणेरिया यांची निवड करण्यात आली.
नगर परिषद सभापती पदासाठी निवडणूक घेण्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी कार्य बघितले. त्यांच्या सहकार्यासाठी इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, नगराध्यक्ष सोनाली अमृत देशपांडे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर व सर्व नगर परिषद सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

निवड झालेली समिती, सभापती व सदस्य
अध्यक्ष सोनाली देशपांडे भाजपा, उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर शिवसेना, सभापती नरेश कुंभारे राष्ट्रवादी, सदस्य श्वेता मानकर भाजपा, राखी गुणेरिया भाजपा, संतोष मोहने भाजपा, विजय बन्सोड भाजपा, अनिता अरोरा भाजपा, भावना चवळे शिवसेना, द्वारका भोंडेकर राष्ट्रवादी, प्रभू असाटी राष्ट्रवादी, रश्मी बुराडे राष्ट्रवादी, ममता हट्टेवार राष्ट्रवादी, अजयसिंह गौर राष्ट्रवादी, जगदीश कटरे राष्ट्रवादी, किरण डहाटे राष्ट्रवादी, सोनाली श्रीराम राष्ट्रवादी, स्वीकृत सदस्य जिब्राईल खॉ पठान राष्ट्रवादी, स्वीकृत सदस्य राजेश गुणेरिया भाजपा.

Web Title: BJP dominates in the post of Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.