अखेर इसापूर ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:30 AM2021-02-16T04:30:28+5:302021-02-16T04:30:28+5:30

इसापूर : अर्जुनी-मोर तालुक्यातील इसापूर ग्रामपंचायतवर भाजपाने झेंडा फडकविला. सरपंचपदी कल्पना शिवकुमार करंबे तर उपसरपंचपदी दिलीप नामदेव सोनवणे यांची ...

BJP flag at Isapur Gram Panchayat () | अखेर इसापूर ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा ()

अखेर इसापूर ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा ()

Next

इसापूर : अर्जुनी-मोर तालुक्यातील इसापूर ग्रामपंचायतवर भाजपाने झेंडा फडकविला. सरपंचपदी कल्पना शिवकुमार करंबे तर उपसरपंचपदी दिलीप नामदेव सोनवणे यांची निवड करण्यात आली. सरपंच व उपसरपंच निवडीत इसापूर गावात काही वेळ तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.

विशेष म्हणजे भाजप समर्थित तीन उमेदवार निवडून आले होते. तर गावविकास पॅनल समर्थित तीन उमेदवार निवडून आले होते. तर गजानन चांदेवार यांच्या गटाची एक महिला उमेदवार निवडून आली होती. त्यामुळे एकमेव निवडून आलेली कल्पना करंबे या कोणत्या गटाला जाऊन मिळतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. गजानन चांदेवार हे भाजप समर्थक असल्याने करंबे यांना सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून सरपंचपदी आरूढ करण्यासाठी भाजपाच्या तीन उमेदवारांनी मतदान केले. कल्पना करंबे यांना चार मते मिळाली तर गावविकास पॅनलच्या दीक्षा लांजेवार यांना तीन मते मिळाली. उपसरपंच पदासाठी गावविकास पॅनलने दिलीप सोनवणे यांचे नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. भाजप समर्थित दिलीप सोनवणे यांना आपल्या गटात आणण्यासाठी विकास पॅनलने आटोकाट प्रयत्न केले. पण दिलीप सोनवणे यांनी भाजपा समर्थित उमेदवार कल्पना करंबे यांना मतदान केले. उपसरपंच पदासाठी केवळ एकच अर्ज असल्याने दिलीप सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून एम.एच. टेंबरे यांनी काम पाहिले. निमकर, ग्रामसेवक विनोद एस श्रीवास्‍तव उपस्थित होते.

Web Title: BJP flag at Isapur Gram Panchayat ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.