भाजप सरकारची पीक विमा योजना फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 09:20 PM2018-12-17T21:20:11+5:302018-12-17T21:20:33+5:30

भाजप सरकारच्या राज्यात प्रत्येकालाच ठगल्यासारखे वाटत आहे. शेतकरी कर्जमाफीची योजना पुढे करून त्यावर अनेक शर्ती लावण्यात आल्या. परिणामी कित्येक शेतकरी त्यातून बाहेर करण्यात आले. तर कित्येक आजही कर्जमाफीच्या पतीक्षेत आहेत. तोच प्रकार पीक विमा योजनेचा आहे. कोट्यवधी रूपये पीक विम्याच्या नावावर जमा केले. मात्र दुष्काळानंतरही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. भाजप सरकारची पीक विमा योजना फेल ठरल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.

BJP government's Crop Insurance scheme fails | भाजप सरकारची पीक विमा योजना फेल

भाजप सरकारची पीक विमा योजना फेल

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम बिरसोला येथील विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भाजप सरकारच्या राज्यात प्रत्येकालाच ठगल्यासारखे वाटत आहे. शेतकरी कर्जमाफीची योजना पुढे करून त्यावर अनेक शर्ती लावण्यात आल्या. परिणामी कित्येक शेतकरी त्यातून बाहेर करण्यात आले. तर कित्येक आजही कर्जमाफीच्या पतीक्षेत आहेत. तोच प्रकार पीक विमा योजनेचा आहे. कोट्यवधी रूपये पीक विम्याच्या नावावर जमा केले. मात्र दुष्काळानंतरही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. भाजप सरकारची पीक विमा योजना फेल ठरल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम बिरसोला येथील ६० रूपयांच्या निधीतून निर्मित अंतर्गत सिमेंट रस्त्याचे लोकार्पण व ३ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर बाजार मैदानातील गट्टू लावण्याच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य लोकचंद दंदरे होते. त्यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे गोंदिया विधानसभा क्षेत्रात विकास कामांना गती मिळाली आहे. यामुळेच जेथे विकास कामांचा विषय निघतो तेथे आमदार अग्रवाल यांचे नाव पुढे येत असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला तहसीलदार सारंग, चमन बिसेन, ओमप्रकाश भक्तवर्ती, बबीता देवाधारी, आनंद तुरकर, आशिष चव्हाण, देवेंद्र मानकर, कत्तेलाल मातरे, निर्वता पाचे, झनकसिंग तुरकर, दिलीप तुरकर, कपूरचंद पाचे, रामभगत पाचे, कांती पाचे, डॉ. देवा जमरे, कविता दंदरे, सरोजनी दंदरे, डिलेश्वरी पाचे, प्रिती तुरकर, सुरवन पाचे, नेतलाल मात्रे, केशव नागफासे, संजय देवाधारी, बालाराम खैरवार, रूखी पाचे, माणिकचंद तुरकर, सोमेश्वरी पाचे, शामराव तुरकर, कैलाश देवाधारी, मोहपत खरे, अमृत तुरकर, तपेश सोनवाने यांच्यासह कॉँग्रेस कार्यकर्ता व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
वैयक्तिक लाभ शिबिराचे आयोजन
या कार्यक्रमाचे निमित्त साधून आमदार अग्रवाल यांच्या उपस्थितीत वैयक्तीक लाभ योजनांचे शिबिर घेण्यात आले. यात ४५ उत्पन्न प्रमाणपत्र, ३० वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र व ४६ ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच श्रावणबाळ योजनेचे ३०, रेशनकार्डचे १८, सेतू ३१ व मतदार यादीबाबत ११ अर्ज प्राप्त झाले. शिवाय आमदार अग्रवाल यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांना सोडविण्याचे निर्देश संबंधीत अधिकाºयांना दिले.

Web Title: BJP government's Crop Insurance scheme fails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.