भाजपने अपेक्षाभंग केला

By admin | Published: October 6, 2015 02:20 AM2015-10-06T02:20:52+5:302015-10-06T02:20:52+5:30

केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे स्वप्न दाखविणारे सरकार आहे. या सरकारने जनतेला खोटी

The BJP has displeased the BJP | भाजपने अपेक्षाभंग केला

भाजपने अपेक्षाभंग केला

Next

अर्जुनी-मोरगाव/सडक अर्जुनी : केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे स्वप्न दाखविणारे सरकार आहे. या सरकारने जनतेला खोटी आश्वासने देऊन त्यांचा अपेक्षाभंग केला आहे. आमचे सरकार सत्तेवर असताना सर्वसामान्यांसाठी आपण शासनाशी भांडलो, आता तर विरोधात असतानाही जनता जनार्दनावर होणारा अन्याय खपवून घेणार नाही, असा इशारा लोकसेवा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिला.
अर्जुनी मोरगाव येथील पंचायत समिती पटांगणावर आयोजित नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. तत्पुर्वी दुर्गा चौक येथून प्रचार रॅली काढण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सावनेरचे आमदार सुनील केदार, माजी आमदार रामरतन राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, सदस्य गिरीश पालीवाल, अमर वऱ्हाडे, राधेलाल पटले, अर्जुन नागपुरे, पंचायत समिती उपसभापती आशा झिलपे, नितीन पुगलिया, राजेश नंदागवळी, किरण कांबळे, विशाखा साखरे, सुरेखा नाईक, रत्नदीप दहीवले, नानाजी मेश्राम, करुणा नांदगावे, डॉ. वल्लभदास भुतडा, विजय लाडे, एस.एम. नरुले उपस्थित होते. पुढे बोलताना आ. अग्रवाल यांनी, भाजपच्या ‘अच्छे दिन’ची खिल्ली उडवत नगर पंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसला कौल द्या, अर्जुनी मोरगाव शहराला नंबर एकचे शहर बनवू व एक आदर्श नगरपंचायत म्हणून पुढे आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. संचालन माजी जि.प. अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे यांनी केले. प्रास्ताविक मांडून आभार भागवत नाकाडे यांनी मानले.
नगर पंचायत काँग्रेसच्या हातात द्या
केंद्राचा आणि राज्याचा विकास फक्त काँग्रेस पक्षच करु शकते. दुसऱ्या पक्षात फक्त आशवासेनच मिळतात, अशी टिका आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केली. येथील दुर्गा चौकात रविवारी (दि.४) नगर पंचायत निवडणुकीला घेऊन आयोजित कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे होते. तर प्रमुख मार्गदर्शक आमदार सुनिल केदार, माजी आमदार रामरतन राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी. कटरे, झामसिंग बघेले, जगदीश येरोला, रमेश अंबुले, रजा पटेल, नामदेव किरसान, अर्जुन नागपूरे, शेषराव गिऱ्हेपुंजे, रामलाल राऊत, राजेश नंदागवळी, जिल्हा परिषद सदस्य सरिता कापगते, राजू पटले, अनिल राजगिरे, जाकीर पटेल मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी गिऱ्हेपुंजे यांनी, आतापर्यंत सरपंच व उपसरपंचांनी पाटीवर आपले नाव यावे यासाठीच राजकारण केले. यात गावाचा विकास झाला नाही. पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्याचे अतिक्रमण, नाल्या अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी आपण नगर पंचायतमध्ये काँग्रेसला मतदान करुन पाठवा, आम्ही विकास करु, असे आवाहन केले. आमदार केदार यांनी, भाजपाच्या अच्छे दिन वर चांगलीच फिरकी घेतली. प्रास्ताविक राजू पटले यांनी मांडले. संचालन राजगिरे यांनी केले तर आभार शहीद पटेल यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

१८० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
४नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे १८० कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. यात नवीन नशिने, किशोर शहारे, सोमेश्वर सौंदरकर, प्रवीण शहारे, सुनील लंजे, रामदास सूर्यवंशी, पारेश्वर ठोंबरे, नंदिनी धकाते, पंचशीला मेश्राम, वंदना शहारे, यमू ब्राह्मणकर, अनोज शहारे, दिवाकर शहारे यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

Web Title: The BJP has displeased the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.