अपयश लपविण्यासाठी विरोधकांवर चढाई करण्यात भाजपचा हातखंडा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:31 AM2021-09-21T04:31:54+5:302021-09-21T04:31:54+5:30
देवरी : केंद्रातील सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ...
देवरी : केंद्रातील सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. याचा सामान्य माणसाच्या जीवनमानावर परिणाम पडत आहे. हे सर्व अर्थकारण कार्यकर्त्यांनी जनतेला समजावून सांगावे. भाजपचे लोक विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टीका करून केंद्र सरकारचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत असून, यात त्यांचा हातखंडा आहे. सामान्य जनतेला वेठीस धरू पाहणाऱ्या भाजपला धडा शिकविण्यासाठी आगामी नगर परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ द्या, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले आहे.
येथील सी.के. बिसेन यांच्या निवासस्थानावरील शाळेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी आमदार मनोहर चंद्रिकापुरे व जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी आमदार चंद्रिकापुरे यांनी मागील काही महिन्यांपासून शेतकरी विरोधी केंद्र सरकारने आणलेल्या तीन काळ्या कायद्यांविरोधात देशाच्या राजधानीच्या वेशीवर हजारो शेतकरी आंदोलन करीत आहेत. कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारकडे काही ठोस धोरण नाही. लसीकरण मोहिमेचा बोजवारा उडालेला आहे. कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लहरीचे नियोजन नाही असे सांगितले. शिवनकर यांनी केंद्र सरकारच्या अपयशाचा पाढा जनसामान्यांपर्यंत पोहोचवून राष्ट्रवादी काँग्रेसला जास्तीत जास्त लोक कसे जोडता येतील याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी करावा, असे सांगितले.
बैठकीला नरेश माहेश्वरी, रमेश ताराम, सि.के. बिसेन, गोपाल तिवारी, मुन्ना हन्सारी, दिलीप द्रुपकर, सुजित अग्रवाल, मुकेश खरोले, मोशीन हन्सारी, भैयालाल चांदेवार, श्रावन बिंझलेकर, पारबता चांदेवार, सुमन बिसेन, अर्चना ताराम, मंजूषा वासनिक, शर्मिला टेंभुर्णीकर, रूपाली गोडसेलवार, किरण उजवणे, शकून राऊत, मुन्नी शेख, मीना कुंभरे, शीला मानकर, अंजना नेवारे, ममता पाथोडे, उत्तरा रहेले, इंदिरा लाडेकर, निर्मला निकोडे, सविता बडवाईक, लक्ष्मी मेश्राम यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.