भाजप सदस्यांचा घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:17 PM2018-08-27T22:17:52+5:302018-08-27T22:18:05+5:30

भुयारी गटार योजनेच्या मुख्य विषयासह चार विषयांना घेऊन सोमवारी (दि.२७)बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेत सर्वच विषयांना मंजुरी मिळाली. मात्र सभेत सत्ता पक्षातील १३ सदस्यांनी भुयारी गटार योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडे देण्याचा विरोध दर्शविला. यामुळे विशेष सभा चांगलीच गाजली. आता विरोधात गेलेल्या १३ सदस्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

BJP members are in the house | भाजप सदस्यांचा घरचा आहेर

भाजप सदस्यांचा घरचा आहेर

googlenewsNext
ठळक मुद्दे१३ सदस्यांनी केला विरोध : विशेष सभेत सर्वच विषयांना मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भुयारी गटार योजनेच्या मुख्य विषयासह चार विषयांना घेऊन सोमवारी (दि.२७)बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेत सर्वच विषयांना मंजुरी मिळाली. मात्र सभेत सत्ता पक्षातील १३ सदस्यांनी भुयारी गटार योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडे देण्याचा विरोध दर्शविला. यामुळे विशेष सभा चांगलीच गाजली. आता विरोधात गेलेल्या १३ सदस्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहराला केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेतून भुयारी गटार योजना मिळाली आहे. १३४ कोटींची ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून कार्यान्वीत केली जाणार आहे. मात्र त्यासाठी मजीप्राला नगर परिषदेचा ठराव द्यावयाचा आहे.
यासाठी सोमवारी (दि.२७) नगर परिषदेच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. भुयारी गटार योजनेसह चार विषयांना घेऊन बोलाविण्यात आलेल्या या सभेत सर्वांचे लक्ष भुयारी गटार योजनेच्या विषयाकडे लागले होते. नगराध्यक्ष अशोक इंगळे व मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या सभेत बहुजन समाज पक्षाचे संकल्प खोब्रागडे सोडून अन्य ४१ सदस्य उपस्थित होते. अशात मात्र नगर परिषदेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षातीलच १३ सदस्यांनी भुयारी गटार योजना महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला देण्याला विरोध दर्शवून सभात्याग केला.
मात्र त्यानंतर उपस्थित अन्य सदस्यांच्या मंजुरीने सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली. अर्थात संख्याबळ जास्त असल्याने विशेष सभेतील सर्वच विषयांना मंजुरी मिळाली. भुयारी गटार योजना ही शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मानली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा ही योजना शहरासाठी मंजूर करुन सर्व नगरसेवकांना याला सहकार्य करण्यास सांगितल्याची माहिती आहे. मात्र आता सत्ता पक्षाच्या १३ नगरसेवकांनी ही योजना नगर परिषदेने पूर्ण करावी, असा आग्रह धरीत विरोध केला. त्यामुळे हे एकप्रकारे मुख्यमंत्र्याच्या आदेशाला आव्हान असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे विरोध करणाऱ्या सदस्यांवर पक्ष काय कारवाही करते याकडे लक्ष लागले आहे.

उच्च न्यायालयात जाण्याची तयारी
विशेष सभेत नगर परिषद उपाध्यक्ष शिव शर्मा, धर्मेश अग्रवाल, दिलीप गोपलानी, विवेक मिश्रा, अनिता मेश्राम, अफसाना पठाण, मौसमी सोनछात्रा, हेमलता पतेह, नितू बिरीया, वर्षा खरोले, भावना कदम, आशालता चौधरी, मैथूला बिसेन या सत्तापक्षातील भारतीय जनता पक्षाच्या १३ सदस्यांनी भुयारी गटार योजना महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला देण्याचा विरोध केला. तसेच नगर परिषदेने योजना राबवावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे, ज्या लक्ष्मी कंस्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले आहे तिने वाढीव पाणी पुरवठा योजनेतील पाईप लाईन टाकण्याचे काम योग्यरित्या केले नाही. शिवाय नगर परिषद पैसे भरणार असताना ही योजना मजीप्राला कशाला द्यायची अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे आता भुयारी गटार योजनेला घेऊन उच्च न्यायालयात जाणार असल्याचे उपाध्यक्ष शर्मा व नगरसेवक गोपलानी यांनी सांगितले.
विरोधकांनी दिला मदतीचा हात
राजकारणात विरोधकांकडून विरोध केला जात असल्याचे बघावयास मिळते. मात्र नगर परिषदेच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. याचाच प्रत्यय सोमवारच्या (दि.२७) विशेष सभेत आला एकीकडे सत्ता पक्षातील नगरसेवक विरोध करताना दिसले. तर दुसरीकडे मात्र विरोधी पक्षात असलेल्या कॉँग्रेस, राष्ट्रवादी व परिवर्तन आघाडीच्या सदस्यांनी मदतीचा हात देत भुयारी गटारसह अन्य विषयांना मंजुरी दिली. त्यामुळे नगर परिषदेच्या कोण कुणाचा खरा सोबती हेच क ळेनासे झाले आहे.

Web Title: BJP members are in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.