बाजार समितीवर भाजपचा कब्जा

By admin | Published: May 9, 2017 12:57 AM2017-05-09T00:57:00+5:302017-05-09T00:57:00+5:30

कृषी उत्पन्नबाजार समितीची निवडणूक रविवारी (दि.७) घेण्यात आली.

BJP occupy market committee | बाजार समितीवर भाजपचा कब्जा

बाजार समितीवर भाजपचा कब्जा

Next

सर्वाधिक १० संचालक : काँग्रेसकडून सत्ता खेचली
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : कृषी उत्पन्नबाजार समितीची निवडणूक रविवारी (दि.७) घेण्यात आली. या निवडणुकीत भाजप प्रणित सहकार पॅनल तर काँग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणित किसान विकास पॅनलमध्ये सरळ लढत झाली. सोमवारी (दि.८) आलेल्या निकालात भाजपाचे सर्वाधीक १० तर राकाँ-काँग्रेसचे ८ व अपक्ष १ उमेदवार विजयी झाला.
१९ संचालकाच्या बाजार समितीमध्ये सर्वाधीक १० संचालक पाठवित भाजपने काँग्रेसच्या हातातून सत्ता खेचून पुन्हा कब्जा मिळविला.
कृषी उत्पन्न बाजारा समितीची निवडणूक निर्णय अधिकारी अनिल गोस्वामी यांच्या मार्गदर्शनात रविवारी (दि.७) घेण्यात आली. तर सोमवारी (दि.८) पंचायत समितीच्या सभागृहात निकाल शांततेत देण्यात आला. यावेळी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत गुप्ता, सुनंदा मारवाडे, सिद्धार्थ गणविर यांच्यासह सर्व पक्षांचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
या निवडणुकीत ५ गटातून १९ उमेदवार निवडून देण्यात आले. यात भाजपाचे १०, राकाँ-काँग्रेसचे ८ तर अपक्ष असे १९ उमेदवार विजयी झाले. यात व्यापारी गटातून भाजपचे मोरेश्वर दसाराम कटरे तर अपक्ष उमेदवार शेख निजाजुद्दीन जिब्राईल विजयी झाले. विविध सेवा सहकारी गटातून किशोर गौतम, दसाराम सहूसकार, राधीका येळे, निलवंता रहांगडाले, योगराज पारधी, डोमाजी बोपचे, ऋषीपाल टेंभरे, व्यंकटराव कटरे विजयी झाले. ग्रामपंचायत गटामध्ये राकाँ-काँग्रेसचे जितेंद्र कटरे, डहारे, डिलेश्वरी तिरेले, मदनलाल कोटांगले, विपणनमध्ये डेमेंद्र रहांगडाले, सेवा सहकारीमध्ये पृथ्वीराज चव्हाण व श्रीप्रकाश रहांगडाले तर हमाल गटातून भाजपाचे गुजोबा वाघाडे विजयी झाले व भाजपाने १९ मधून १० उमेदवार जिंकून बहुमत मिळवित पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपला कब्जा स्थापित केला.

Web Title: BJP occupy market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.