भाजप दलित समाजाच्या पाठीशी सदैव राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:34 AM2021-08-21T04:34:04+5:302021-08-21T04:34:04+5:30
गोंदिया : स्वत:ला दलित समाजाचे हितैशी म्हणवून घेणाऱ्या काँग्रेस- राष्ट्रवादीने इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दिली ...
गोंदिया : स्वत:ला दलित समाजाचे हितैशी म्हणवून घेणाऱ्या काँग्रेस- राष्ट्रवादीने इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दिली नाही. तेच भारतीय जनता पक्षाच्या शासन काळात इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिली. लंडन येथील त्यांचे निवासस्थान खरेदी करून संग्रहालय स्थापित केले. एवढेच नव्हे तर बाबासाहेबांची १२५ वी जयंती वर्षभर साजरी करून दलित समाजाच्या विकासासाठी कित्येक योजना लागू केल्या. भाजप दलित समाज हितैशी असून, यामुळेच दलित समाजाने भाजपशी जुळून समाजविकासात हातभार लावावा, असे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
भाजपच्या वतीने आयोजित ग्रामीण मंडळ कार्यकारिणी सदस्य, जिप-पंस क्षेत्रप्रमुख, आजी-माजी सदस्य, तसेच शक्ती केंद्र व बूथप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष केशव मानकर यांनी एक-एक कार्यकर्त्याला जोडणारा पक्ष भाजप असल्याचे सांगितले, तर नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी, नवीन कार्यकर्त्यांना जोडून पक्ष संघटनेला मजबूत करायची गरज असल्याचे सांगितले. सभेला धनलाल ठाकरे, माधुरी हरिणखेडे, वीरेंद्र अंजनकर, प्रकाश रहमतकर, मनोज मेंढे, अर्जुन नागपुरे, शंभुशरण ठाकूर, सुनील केलनका, अजित मेश्राम, सुभाष आकरे, सुरेखा भेंडारकर, संजू कुलकर्णी, गजेंद्र फुंडे, अशोक चौधरी, नरेंद्र चांदवानी, सत्यम बहेकार, नारी चांदवानी, विजय लोणारे, सूरजलाल महारवाडे, गेंदलाल शरणागत यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.