नगर परिषदेत पुन्हा भाजपराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:06 AM2019-02-17T00:06:05+5:302019-02-17T00:07:24+5:30

गोंदिया परिवर्तन आघाडीच्या गट नेत्यावर अवलंबून असलेली नगर परिषद सभापतिपदाची निवडणूक अखेर भारतीय जनता पक्षाच्या मर्जीप्रमाणेच पार पडली. न्यायालयाच्या निर्णयाने आघाडीचे गट नेता राजकुमार कुथे हेच ठरले व त्यांनीच दोन नावे सुचविल्याने निवडणुकीचे अवघे चित्रच पालटले.

BJPRaj again in the city council | नगर परिषदेत पुन्हा भाजपराज

नगर परिषदेत पुन्हा भाजपराज

Next
ठळक मुद्देआघाडीचे गटनेते कुथेच : गदारोळात पार पडली निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया परिवर्तन आघाडीच्या गट नेत्यावर अवलंबून असलेली नगर परिषद सभापतिपदाची निवडणूक अखेर भारतीय जनता पक्षाच्या मर्जीप्रमाणेच पार पडली. न्यायालयाच्या निर्णयाने आघाडीचे गट नेता राजकुमार कुथे हेच ठरले व त्यांनीच दोन नावे सुचविल्याने निवडणुकीचे अवघे चित्रच पालटले. गदारोळात निवडणूक पार पडली असली तरीही नगर परिषदेत पुन्हा भाजपराज आला.
नगर परिषद सभापतींचा कार्यकाळ संपल्याने शनिवारी (दि.१६) सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली. मागील वर्षी झालेल्या लहानशा चुकीमुळे भाजपला सर्वात महत्वाचे बांधकाम समिती सभापतीपद गमवावे लागले होते. त्यामुळे यंदा भाजप अत्यंत सावधरित्या नजरा लावून होती. मात्र गोंदिया परिवर्तन आघाडी, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस एकत्र येवून समिकरण बिघडविण्याच्या प्रयत्न होते व तसेच झाले. मात्र आघाडी गटनेता पद अखेर भाजपच्या समर्थनात असलेले कुथे यांच्याकडे गेल्याने आघाडीचे गणीत फिस्कटल्याचे दिसले.
निवडणुकीत गट नेता म्हणून कुथे यांनी त्यांच्या दोन सदस्यांची नावे दिल्याने सर्वच पदे भाजप तसेच आघाडीतील अपक्ष सदस्य सचिन शेंडे यांना मिळाले.
तर ११ सदस्यीय स्थायी समितीत नगराध्यक्ष अशोक इंगळे, उपाध्यक्ष शिव शर्मा, पदसिद्ध सदस्य धर्मेश अग्रवाल, मैसमी परिहार, नितू बिरीया, सचिन शेंडे, वर्षा खरोले असतानाच भाजपने घनशाम पानतवने, कॉँग्रेसने क्रांती जायस्वाल यांना तर आघाडीकडून कुथे यांनी नेहा नायक यांना पाठविले. एकंदर नगर परिषदेत सर्व काही भाजपच्या मर्जीप्रमाणे झाल्याने नगर परिषदेत पुन्हा भाजपराज आला.
सभागृहातच विरोधकांचे धरणे आंदोलन
निवडणूक दरम्यान आघाडीतील गट नेता कु थे तसेच बसपच्या सदस्यांनी निवडलेल्या गट नेता ललीता यादव यांनी व्हीप जारी केले होते. तसेच सभागृहात कोण नावे निर्देशित करणार या विषयाला घेऊन चांगलाच गदारोळ झाला. यावर पिठासीन अधिकाऱ्यांनी सद्य स्थितीत आघाडीचे गट नेता म्हणून कुथे यांनाच नावे निर्देशित करण्याचा अधिकार असल्याचे सांगीतले. यावर मात्र विरोधकांकडून विरोध करण्यात आला. तसेच निवडणूक प्रक्रीयेचा विरोध करीत नारेबाजी करीत सदस्य धरण्यावर बसले होते. एवढेच नव्हे तर, बसपच्या ५ सदस्यांनी निवडणुकीत मतदानही केले नाही.
शेंडे यांची लागली लॉटरी
निवडणुकीत बांधकाम समितीसाठी भाजपकडून धर्मेश अग्रवाल तर आघाडीकडून लोकेश यादव, शिक्षण समितीसाठी भाजपकडून मौसमी परिहार तर कॉंग्रेसकडून निर्मला मिश्रा, पाणी पुरवठा समितीसाठी भाजपक डून नितू बिरीया तर कॉँग्रेकडून दिपीका रूसे, नियोजन समितीसाठी आघाडीतील अपक्ष सदस्य सचिन शेंडे तर राष्ट्रवादीकडून विनीत सहारे तसेच भाजपक डून विवेक मिश्रा तर महिला व बाल कल्याण समितीसाठी भाजपकडून वर्षा खरोले तर आघाडीकडून ज्योत्सना मेश्राम यांची नावे होती. यात ७ -५ मतदानाने धर्मेश अग्रवाल, मौसमी परिहार, नितू बिरीया व वर्षा खरोले हे जिंकले. तर नियोजन समितीत सचिन शेंडे भाजपच्या समर्थनात असल्याने भाजपकडून विवेक मिश्रा यानी आपले नाव मागे घेतले. अशात शेंडे जिंकले असून नियोजन समिती सभापतीपदाची माळ त्यांच्या गळ््यात पडली.

Web Title: BJPRaj again in the city council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.