शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भाजपचे धरणे आंदोलन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:22 AM2021-05-29T04:22:35+5:302021-05-29T04:22:35+5:30

परसवाडा : रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी केंद्र सुरू करणे व बोनसच्या रकमेसह अन्य मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने आमदार विजय ...

BJP's dam agitation for farmers' rights () | शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भाजपचे धरणे आंदोलन ()

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भाजपचे धरणे आंदोलन ()

Next

परसवाडा : रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी केंद्र सुरू करणे व बोनसच्या रकमेसह अन्य मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने आमदार विजय रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात गुरुवारी (दि.२७) तिरोडा येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

सरकारने जाहीर केलेले ७०० रुपये बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, सरकारी धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करून रब्बी धान खरेदी करावे, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेली ५० हजार रुपयांची प्रोत्साहन राशी त्यांच्या खात्यात जमा करावी, तसेच धडक सिंचन विहिरीच्या प्रलंबित बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, यांसह अन्य मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले, तसेच मागण्या मंजूर न केल्यास पुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे यांनी निवेदनातून दिला आहे. आंदोलनात डॉ. बसंत भगत, डॉ. चिंतामण राहांगडाले, विजय डिंकवार, स्वानंद पारधी, डॉ. बी. एस. रहांगडाले, तेजराम चव्हाण, प्रवीण पटले, जितेंद्र रहांगडाले, दिगंबर ढोक, राजेश मलघाटे, तुमेश्वरी बघेले, घनश्याम पारधी, डॉ. रामप्रकाश पटले, तिरुपती राणे, भरत गुरव, रमणिक सयाम, संजयसिंग बैस, प्यारेलाल पटले, जितू टेंभेकर, संजय नागदेवे, महादेव कटनकार, शिवलाल परिहार इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: BJP's dam agitation for farmers' rights ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.