पालकमंत्र्याच्या दत्तक गावातच भाजपाचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:27 AM2017-07-19T00:27:01+5:302017-07-19T00:27:01+5:30

तालुक्यातील कनेरी/राम येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित संस्थेच्या पार पडलेल्या

BJP's defeat in the Guardian's adopted village | पालकमंत्र्याच्या दत्तक गावातच भाजपाचा पराभव

पालकमंत्र्याच्या दत्तक गावातच भाजपाचा पराभव

Next

कनेरी/राम सहकार संस्थेवर शेतकरी सहकार परिवर्तन पॅनलचा विजय
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : तालुक्यातील कनेरी/राम येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित संस्थेच्या पार पडलेल्या निवडणूकीत शेतकरी सहकार परिवर्तन पॅनलने शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत पराभव केला.
रविवारी (दि.१६) झालेल्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचा एकही उमेदवार निवडून येवू शकला नाही. विशेष म्हणजे हे गाव पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दत्तक घेतले आहे. त्याच गावात भाजपाचा पराभव झाल्याने वेगळ्याच चर्चेला उधान आले आहे.
निवडून आलेल्या शेतकरी सहकार परिवर्तन पॅनलच्या सदस्यामंध्ये जामेश्वर धनभाते, ईश्वर कोरे, आकोजी रहिले, ज्ञानदेव गहाणे, सुर्यादेव घरत, नामेश्वर कुरसुंगे, अशोक कुरसुंगे, गोपाळा घोरमोडे, चिंधू बोपचे, फुलचंद चवरे, गेंदलाल मेश्राम, रंजना भोयर, कल्पना मडावी या १३ सदस्यांचा समावेश आहे. कनेरी हे पालकमंत्री बडोले यांचे दत्तक गाव असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपाच्या काही जुन्या कार्यकर्त्यांवर जनता नाराज असल्याने हा पराभव झाल्याची चर्चा आहे.
कनेरी/राम येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ही जिल्ह्यातील सर्वात मोठी सहकारी संस्था आहे. भाजपासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची केली होती.

Web Title: BJP's defeat in the Guardian's adopted village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.