भाजप प्रवेशाची अफवा आधारहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:36 PM2019-06-01T23:36:53+5:302019-06-01T23:37:13+5:30

मागील काही दिवसांपासून आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत असल्याच्या अफवा वृत्तपत्र तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून क्षेत्रात पसरत आहे. मात्र त्या अफवांना काहीच आधार नाही. आम्ही क्षेत्रात विकासकामांना गती दिली असून त्यामुळे क्षेत्रातील मतदाता निश्चिीतच आमच्या सोबत आहेत.

The BJP's entry rumor is baseless | भाजप प्रवेशाची अफवा आधारहीन

भाजप प्रवेशाची अफवा आधारहीन

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल। तालुका काँग्रेस कमिटीची विशेष सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील काही दिवसांपासून आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत असल्याच्या अफवा वृत्तपत्र तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून क्षेत्रात पसरत आहे. मात्र त्या अफवांना काहीच आधार नाही. आम्ही क्षेत्रात विकासकामांना गती दिली असून त्यामुळे क्षेत्रातील मतदाता निश्चिीतच आमच्या सोबत आहेत. अशात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निराश न होता लोकहिताच्या कामांतून काँग्रेसला मजबूत करण्याचे कार्य करावे असे आवाहन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केले.
तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने शनिवारी (दि.१) येथील शहीद भोला काँग्रेस भवन मध्ये आयोजीत विशेष ते बोलत होते.
या सभेत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पिरिपा, खोरिपाच्या संयुक्त उमेदवारांच्या पराजयाच्या कारणांवर तसेच भविष्यात त्यांची दुरूस्ती करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सभेला काँग्रेस कमिटी जिलाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, सेवादल अध्यक्ष पन्नालाल सहारे, गोंदिया-भंडारा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रफुल अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, विमल नागपुरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, रूद्रसेन खांडेकर, चमन बिसेन, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, हरिचंद कावडे, बंटी भेलावे, संदीप रहांगडाले, पृथ्वीपालसिंग गुलाटी, आनंद तुरकर, चुन्नी बेंद्रे, धनलाल ठाकरे, श्याम गणवीर यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Web Title: The BJP's entry rumor is baseless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.