सालेकसा तालुक्यात भाजपची कंबर मोडली

By admin | Published: July 7, 2015 12:55 AM2015-07-07T00:55:09+5:302015-07-07T00:55:09+5:30

गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलीच सत्ता कायम राहील या भ्रमात असलेल्या भारतीय जनता पक्षाला सालेकसा तालुक्यात ...

BJP's waist in Sailakasa taluka broke | सालेकसा तालुक्यात भाजपची कंबर मोडली

सालेकसा तालुक्यात भाजपची कंबर मोडली

Next

राकाँ, काँग्रेसने केले किले ध्वस्त : बाहेरचे उमेदवार ठरले आत्मघाती
विजय मानकर सालेकसा
गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलीच सत्ता कायम राहील या भ्रमात असलेल्या भारतीय जनता पक्षाला सालेकसा तालुक्यात मतदारांनी धडा शिकविलेल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात जि.प.च्या चार जागांपैकी फक्त एक आणि पं.स.च्या आठ जागांपैकी तीनच जागा भाजपच्या खिशात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातूनच नव्हे तर तालुक्यातून सुद्धा भाजप सत्तेबाहेर झाली आहे.
मागील पंचवार्षिकात तालुक्यात जि.प.मध्ये तीन जागा होते. मात्र यावेळी फक्त एक जागा ती म्हणजेच आमगाव खुर्दची कायम राहीली आहे. तर शुन्यावर असलेली काँग्रेस दोन जागेवर झालीया आणि कारुटोला जिंकून आली. कारुटोला काँग्रेसने परत मिळविली तर झालीया येथे काँग्रेस ने जबरदस्त एंट्री केली आहे. येथे दोन वेळा भाजप तर एक वेळा राष्ट्रवादी निवडून आली होती. या क्षेत्रात काँग़्रेसचा नाव घेणारा सुद्धा कोणी दिसत नव्हता. मात्र यावेळी मतदारांनी येथे बाहेरुन आलेल्या भाजप आणि राकाँ दोन्ही पक्षाच्या उमेदवाराला सपेश्ल नकारले. पिपरीया जि.प.क्षेत्रावर १५ वर्षापासून सतत भाजपचा राज होता. मात्र या ठिकाणी जन शक्तीवर धनशक्ती भारी पडली. आणि भाजप भुईसपाट झाली. यावेळी येथे भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहीला. या ठिकाणी ही मतदारांनी बाहेरच्या उमेदवारांना नकारत स्थाानिकाला महत्व दिले. परंतु राष्ट्रवादीच्या दुर्गा तिराले यांची धनशक्ती आणि भाजपचे नाराज कार्यकर्ते यांची साथ मिळाल्यामुळे काँग्रेसचे स्थानिक उमेदवार ओमप्रकाश लिल्हारे चुरशीच्या लढतीत पराभूत झाले.
सालेकसा पंचायत समितीवर एकछत्र राज करणारा भाजप पक्ष यावेळी सत्तेतून बाहेर झालेला दिसत आहे. मागील निवडणुकीत आठ पैकी सहा जागा जिंकत पूर्ण बहुमत घेत सत्ता प्राप्त केली होती.
यावेळी फक्त जुन्या तीन जागा वाचवित तीन जागा गमावल्या आहेत. यात आमगाव खुर्द कावराबांध आणि झालीया भाजपकडे कायम असून पिपरीया टोयागोंदी आणि कारुटोला पं.स. मध्ये मनोज विश्वकर्मा यांचा पुनच विचार केला नाही. ते उपसभापती राहीले असून त्यांचा जनसंपर्क वाढला होता. परंतु उमेदवारी न दिल्याने त्यांनी भाजपशी घटस्फोट केला आणि आपल्या पत्नीला घेवून राष्ट्रवादीच्या मांडव्यात गेले. राष्ट्रवादी ने राजकुमारी विश्वकर्मा यांना टोयागोंदीची उमेदवारी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीने पं.स. बरोबरच जि.प. जिंकण्यातही बाजी मारली. पिपरीया क्षेत्रातच भाजपसाठी मोठा धक्का दायक ठरला. दुसरीकडे काँग्रेसने सोनपुरी आणि लोहारा आपल्याकडे कायम ठेवत पिपरीया आणि कारुटोला भाजपकडून हिसकावून घेतली. आठ पैकी चार जागा जिंकलेल्या काँग्रेसला पूर्ण बहुमत नसला तरी सभापती पद काँग्रेसकडेच राहील तर उपसभापती पद भाजपला की राष्ट्रवादीला देत सत्ता समीकरण कसे बनवतील ते पहावे लागेल. मात्र भाजपला धडा मिळाला एवढे नक्की.
सालेकसा आणि देवरी या तालुक्यात आतापर्यंत आतापर्यंत बहुतांश वेळा भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. हे मतदार संघ ज्या लोकसभा क्षेत्रात येतात त्या देवरीतही भाजपाचेच खासदार आहेत. आमदार म्हणून संजय पुराम यांनीही गेल्या सात महिन्यात आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपचे खासदार आणि आमदार हे मतदारांवरील विश्वास कायम राखण्यात कुठेतरी कमी पडल्याचे दिसून येत आहे.

Web Title: BJP's waist in Sailakasa taluka broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.