विमान खरेदीच्या डाळीत काळेच काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 09:28 PM2018-12-24T21:28:44+5:302018-12-24T21:29:08+5:30

भाजप सरकारने राफेलविमान खरेदी जनतेच्या पैशांनी केली आहे. मात्र खरेदी प्रक्रियेत कित्येक काळे तथ्य सामोर येत आहेत. यामुळे देशातील जनतेसोबतच सेनेचेही मनोबल तुटत आहे. कॉँगे्रसच्या राज्यात ५०० कोटींत मिळणारे विमान भाजप सरकारच्या राज्यात १६०० कोटींचे कसे झाले, हे सरकारने स्पष्ट करायला हवे. कारण विमान खरेदीच्या डाळीत काळेच काळे आहे, असा आरोप आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केला.

Black Pale in the purchase of aircraft | विमान खरेदीच्या डाळीत काळेच काळे

विमान खरेदीच्या डाळीत काळेच काळे

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल यांचा आरोप : जिल्हा कॉँग्रेसचे धरणे आंदोलन, संयुक्त संसदीय समितीकडून चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भाजप सरकारने राफेलविमान खरेदी जनतेच्या पैशांनी केली आहे. मात्र खरेदी प्रक्रियेत कित्येक काळे तथ्य सामोर येत आहेत. यामुळे देशातील जनतेसोबतच सेनेचेही मनोबल तुटत आहे. कॉँगे्रसच्या राज्यात ५०० कोटींत मिळणारे विमान भाजप सरकारच्या राज्यात १६०० कोटींचे कसे झाले, हे सरकारने स्पष्ट करायला हवे. कारण विमान खरेदीच्या डाळीत काळेच काळे आहे, असा आरोप आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केला.
राफेल विमान खरेदीची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी व्हावी तसेच या घोटाळ््यात श्वेतपत्र जाहीर करून संपूर्ण स्थिती देशाला अवगत करावी या मागणीला घेऊन जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्यावतीने सोमवारी (दि.२४) येथील उप विभागायी अधिकारी कार्यालयासमोर आयोजीत धरणे आंदोलनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, ‘अच्छे दिन’च्या अपेक्षेने देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला देश व राज्यासह अनेक राज्यातील सत्ता सोपविली. मात्र भाजप सरकारने प्रत्येकच वर्गाला लुटने व धोका देण्याशिवाय काहीच केले नसल्याचेही ते म्हणाले.
सरकारी बँंकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेऊन उद्योगपती फरार होत आहेत. आता हे सर्वविदीत आहे की या उद्योगपतींना फरार होण्यास भाजप सरकारची मदत आहे. निवडणुकीच्या घोषणापत्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे बोलून निवडणुकीनंतर आपले वचन सरकार विसरली. सरकारने कर्जमाफी केली. मात्र कित्येक अटी लावून ७५ टक्के शेतकºयांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचीत ठेवले. कर्जमाफी सोबतच शेतकºयांना १० हजार रूपयांच्या अग्रीम कर्जाची घोषणा करून शासन निर्णय काढण्यात आला. मात्र एकाही शेतकºयाला हे कर्ज मिळाले नाही. भाजप सरकारने सर्व शेतकºयांना एका नजरेतून बघून सर्वच शेतकºयाना कर्जमाफी द्यावी असे आमदार अग्रवाल म्हणाले.
कॉंग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांनी, कोट्यवधींची रक्कम भाजप सरकारने पीक विमा योजनेच्या नावावर वसूल केली. मात्र दुष्काळानंतरही शेतकºयांना पीक विम्याचा लाभ देण्यात आला नाही. सन २०१७ मधील दुष्काळ व मावा-तुडतुड्याने नुकसान झालेल्या शेतकºयांना राज्य सरकारने मदत घोषीत केली. मात्र आतापर्यंत त्यांना मदत मिळाली नसल्याचे सांगीतले. प्रास्ताविकातून जिल्हा परिषदेचे माजी सभापती पी.जी.कटरे यांनी, आजचे हे धरणे आंदोलन व नुकतेच तीन राज्यातील कॉँग्रेस सरकारचे गठन म्हणजे सर्वसामान्य नागरिक आता भाजपच्या मनमोहक आश्वासनांच्या पाशातून बाहेर आल्याचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त केले.
जिल्हा महासचिव सहषराम कोरोटे यांनी, आज पेट्रोल, गॅस सिलिंडर, रासायनिक खते असो की घरगुती वीज प्रत्येकच वस्तूंचा भाव सरकारने दुप्पट केले आहे. देशात हिंदूू-मुस्लीम समाजातील ताण भाजप राजमुळे असून त्यांचातील भाईचारा खतम करण्याचे काम मोदी सरकार करीत असल्याचा आरोप केला. जिल्हा सचिव राजेश नंदागवळी यांनी, सरकारने आपले अपयश स्वीकारून त्वरीत पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
संचालन महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले. आभार पी.जी. कटरे यांनी मानले. याप्रसंगी माजी मंत्री भरत बहेकार, सचिव विनोद जैन, डॉ.योगेंद्र भगत, महिला अध्यक्ष उषा शहारे, आलोक मोहंती, पन्नालाल सहारे, हरिश तुळसकर, के.आर.शेंडे, रामरतन राऊत, झामसिंग बघेले, एन.डी.किरसान, उषा मेंढे, माधुरी हरिणखेडे, चुन्नी बेंद्रे, धनलाल ठाकरे, अनिल गौतम, यादनलाल बनोठे, विक्की बघेले, रमेश अंबुले, लता दोनोडे, विमल नागपुरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, गिरीष पालीवाल, विजय टेकाम, दीपक पवार, माधुरी कुंभरे, ज्योती वालदे, सरिता कापगते, चमन बिसेन, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, शेषराव गिरेपूंजे, भागवत नाकाडे, संदीप भाटीया यांच्यासह मोठ्या संख्येत कॉँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रपतींच्या नावाने दिले मागण्यांचे निवेदन
राफेल विमान खरेदी प्रकरणाला घेऊन आयोजीत धरणे आंदोलन व सभेनंतर विमान खरेदीची वर्तमान स्थिती स्पष्ट करावी. तसेच विमान खरेदीची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करावी व श्वेतपत्र जाहीर करून संपूर्ण स्थितीने देशाला अवगत करण्याची मागणी करीत उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना आमदार अग्रवाल यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नावाने निवेदन दिले.

Web Title: Black Pale in the purchase of aircraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.