अंध ईशाचे डोळस यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 10:05 PM2019-06-11T22:05:24+5:302019-06-11T22:06:13+5:30
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यममिक व माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल शनिवारला जाहीर झाला. यात येथील जानकीदेवी चौरागडे हायस्कुलची अंध विद्यार्थिनी ईशा किरणकुमार बिसेन हिने ९२.४० टक्के गुण घेऊन अंध विद्यार्थ्यांमधून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यममिक व माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल शनिवारला जाहीर झाला. यात येथील जानकीदेवी चौरागडे हायस्कुलची अंध विद्यार्थिनी ईशा किरणकुमार बिसेन हिने ९२.४० टक्के गुण घेऊन अंध विद्यार्थ्यांमधून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
विशेष म्हणजे चौरागडे हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून या अविनाश येरणे या विद्यार्थ्याने ९१.८० टक्के गुण घेवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर स्रेहल व दिपांशू कांरजेकर यांनी ९१.२० टक्के गुण घेवून व्दितीय क्रमांक पटकाविला आहे. शाळेचे एकूण ५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण तर १९ विद्यार्थ्यांनी ८० टक्केच्यावर गुण प्राप्त केले असून २९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उर्तीण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि मुख्याध्यापक प्रमोद चौरागडे, संचालिका रेखा चौरागडे, संस्थेचे संरक्षक माजी आ.हरिहभाई पटेल यांना व शिक्षकांना दिले आहे.
ईशाला व्हायचे जिल्हाधिकारी
दहावीच्या परीक्षेत ९२.४० टक्के गुण घेवून अंध विद्यार्थ्यांमधून जिल्ह्याततून प्रथम येऊन डोळस यश प्राप्त करणाऱ्या ईशाला प्रशासकीय सेवेत जायचे. बारावी आणि पदवीनंतर युपीएससी व एमपीएसी परीक्षा देऊन जिल्हाधिकारी व्हायचे असल्याचे ईशाने सांगितले. ईशाने दररोज सात ते आठ तास अभ्यास करुन हे यश संपादन केले.यासाठी वडीलांचे व शाळेच्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाल्याचे तिने लोकमतशी बोलताना सांगितले. ईशाचे वडील हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत.