रक्तदानामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:19 AM2021-07-09T04:19:38+5:302021-07-09T04:19:38+5:30
सालेकसा : रक्तदान केल्यावर शरीरात नवीन रक्तपेशी व रक्तरस निर्माण होते. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते. ...
सालेकसा : रक्तदान केल्यावर शरीरात नवीन रक्तपेशी व रक्तरस निर्माण होते. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक स्वस्थ युवक-युवतींनी रक्तदान केले पाहिजे, इतरांचा जीव वाचविण्यास महान कार्य करून स्वत:लाही सुदृढ केले पाहिजे, असे प्रतिपादन मनोहरभाई पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ललित जिवाणी यांनी केले.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ते १५ जुलै दरम्यान लोकमत रक्ताचं नातं रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याच अंतर्गत बुधवारी (दि.७) सालेकसा येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन सालेकसाचे प्रभारी तहसीलदार अरुण भुरे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराच्या सुरुवातीला स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या छायाचित्राला मार्ल्यापण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी आशीष चव्हाण, रक्तपेढीच्या डॉ. पल्लवी गेडाम उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकमतने समूहाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असताना लोकमतने समूहाने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून खऱ्या अर्थाने माणुसकीचे नाते जपले असल्याचे सांगितले. यावेळी रक्तदान शिबिरात ४४ रक्तदात्यांनी पुढे येत रक्तदान केले. रक्तदानासाठी इतरांनी सुध्दा पुढे येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन लोकमतचे तालुका प्रतिनिधी विजय मानकर यांनी केले, तर आभार लोकमत समाचारचे तालुका प्रतिनिधी प्रा.गणेश भदाडे यांनी मानले. शिबिरासाठी मोक्षधाम समितीचे अध्यक्ष संदीप दुबे, सामाजिक कार्यकर्ते सुनील असाटी, राहुल देऊळकर, किरण मोरे, छाया ब्रम्हवंशी, श्याम येटरे, कविता येटरे, इंद्रकला बोपचे, अर्चना गोल्लेवार, अमोल मानकर, प्रा. राठोड आदीनी व बाई गंगाबाई महिला रुग्णालय गोंदिया येथील रक्तपेढीच्या डॉ. पल्लवी गेडाम, डाॅ. हर्षद शर्मा, टेक्निशियन आनंद पडोरे, स्टाफ नर्स सृष्टी मुरकुटे, सहायक परीक्षित बंसोड, विनोद बंसोड यांनी सहकार्य केले.
............
यांनी केले शिबिराला सहकार्य
मोक्षधाम सेवा समिती सालेकसा, नगर पंचायत सालेकसा, लोकमत सखी मंच सालेकसा, वन विभाग सालेकसा व इतर संघटनांनी रक्तदान शिबिराला सहकार्य केले. मनोहरभाई पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य ललित जिवाणी यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे सुध्दा सहकार्य केले. लोकमत सखी मंचच्या महिलांनी स्वयंस्फूर्त रक्तदान करून इतरांना प्रेरित केले. वनपरिक्षेत्राधिकारी अभिजित इलमकर यांनी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून रक्तदान महान दान या कार्यात सहभाग घेतला.