आमगाव येथे रक्ताचं नातं रक्तदान शिबिर आज ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:21 AM2021-07-10T04:21:00+5:302021-07-10T04:21:00+5:30

आमगाव : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ते १५ ...

Blood donation camp at Amgaon today () | आमगाव येथे रक्ताचं नातं रक्तदान शिबिर आज ()

आमगाव येथे रक्ताचं नातं रक्तदान शिबिर आज ()

Next

आमगाव : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ते १५ जुलै दरम्यान लोकमत रक्ताचं नातं उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. याच अंतर्गत शनिवारी (दि. १०) सकाळी १० वाजता बनगाव येथील महादेवराव शिवणकर अध्यापक विद्यालय, सरस्वती विद्यालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. लोकमत समूह आणि भारतीय विद्यार्थी संघटना आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात येत आहे.

शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना लॅपटॉप बॅग, लोकमत गौरव प्रमाणपत्र आणि शासकीय रक्तपेढीचे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी रक्तदान करायला पाहिजे. आपल्या रक्तदानामुळे कोणाचे तरी प्राण वाचू शकतो, ही भावना ठेवून सर्वांनी रक्तदान करावे, असे तालुका आरोग्य अधिकारी विनोद चव्हाण, लोकमत प्रतिनिधी राजीव फुंडे, ९४२३३८४१२२, लोकमत समाचारचे प्रतिनिधी रितेश अग्रवाल, मुरलीधर करंडे, नरेंद्र कावळे, विद्या सिंगाडे, जयश्री फुंडकर, गोपाल अग्रवाल, संजय मोटघरे, पिंकेश शेंडे, दिनू थेर, राहुल उजवणे, विजय रगडे, अजय दोनोडे, मिथुन ठाकरे, प्रफुल्ल ठाकरे, सपन उजवणे, प्रमोद गुडधे, तीरथ येटरे, मारोती कोल्लावार, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन आमगाव, प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ, भारती शिक्षक संघ, पंचायत समिती आमगाव, पोलीस बॉइज संघटना, मोक्षधाम समिती यांनी कळविले आहे.

Web Title: Blood donation camp at Amgaon today ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.