फादर्स डे निमित्त रक्तदान शिबिर ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:20 AM2021-06-22T04:20:19+5:302021-06-22T04:20:19+5:30
देवरी : जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील आदिवासी बांधवांमध्ये शासन व पोलीस प्रशासनाप्रती विश्वासाची व आपुलकीची भावना निर्माण व्हावी, शासकीय यंत्रणा ...
देवरी : जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील आदिवासी बांधवांमध्ये शासन व पोलीस प्रशासनाप्रती विश्वासाची व आपुलकीची भावना निर्माण व्हावी, शासकीय यंत्रणा ही अतिदुर्गम भागात वास्तव्यास असणाऱ्या जनतेकरिता सतत सहकार्य करीत असल्याची भावना निर्माण व्हावी याकरिता ‘फादर्स डे’ निमित्त नक्षलग्रस्त भागातील संवेदनशील गणुटोला येथे रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम रविवारी घेण्यात आला.
कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान केले. गावातील नागरिकांना कोविड आजार व त्यावरील लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आले. गणुटोला येथील स्टाफ तसेच आशा वर्कर यांच्या मदतीने गावातील लोकांचे लसीकरण करण्यात आले. चिचगड वनविभागाचे आरएफओ संगीता ढोबळे यांनी वृक्षारोपणाबाबत गावकऱ्यांना मार्गदर्शन करून वृक्षारोपण करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे, रामशिला कोरोटी, राजीद खान, राजकिरण मडावी इत्यादीसह गावातील प्रतिष्ठित नागरिक व ५० ते ७५ गावकरी हजर होते. अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.