गोंदिया येथे रक्तदान शिबिर आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:21 AM2021-07-15T04:21:21+5:302021-07-15T04:21:21+5:30

गोंदिया : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ जुलैपासून लोकमत ...

Blood donation camp at Gondia today | गोंदिया येथे रक्तदान शिबिर आज

गोंदिया येथे रक्तदान शिबिर आज

Next

गोंदिया : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ जुलैपासून लोकमत रक्ताचं नातं उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. याच अंतर्गत गुरुवारी (दि.१५) रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक शहीद भोला काँग्रेस भवन येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

लोकमत समूह, जिल्हा युवक काँग्रेस, जिल्हा एनएसयुआय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराचे उद्घाटन युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विजयसिंह राजू यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अमर वऱ्हाडे, प्रदेश काँग्रेसचे महासचिव अजितसिंह, गोंदिया जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी रुचित दवे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान महानदान करावे, असे आवाहन लोकमत समूह व विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबा अगडे, एनएसयुआय तालुकाध्यक्ष शैलेश बिसेन, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष रवी चौरासिया व शहराध्यक्ष रुखनेज शेख यांनी केले आहे.

...................

देवरी येथे रक्तदान शिबिर आज

देवरी : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ जुलैपासून लोकमत रक्ताचं नातं उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. याच अंतर्गत गुरुवारी (दि.१५) रोजी सकाळी १०.३० वाजता सिरपूर सीमा तपासणी नाका सभागृह येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. लोकमत समूह, लोकमत सखी मंच, सिरपूर ग्रामपंचायत, समाधान कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी आयोजित शिबिरात सहभागी होऊन रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन लोकमत तालुका प्रतिनिधी सुशील जैन, गजानन शिवणकर, देवरी सखी मंच संयोजिका सिमरन जांगडे यांनी केले आहे.

Web Title: Blood donation camp at Gondia today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.