केशोरी येथे रक्तदान शिबिर आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:20 AM2021-07-16T04:20:56+5:302021-07-16T04:20:56+5:30

केशोरी : स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकमत - रक्ताचं ...

Blood donation camp at Keshori today | केशोरी येथे रक्तदान शिबिर आज

केशोरी येथे रक्तदान शिबिर आज

Next

केशोरी : स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकमत - रक्ताचं नातं या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत शु्क्रवारी (दि.१६) सकाळी १०.३० वाजता अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

शिबिराचे उद्घाटन सरपंच नंदू पाटील गहाणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल, डॉ. राकेश पेशने, ठाणेदार संदीप इंगळे, तालुकाप्रमुख चेतन दहीकर, प्रकाश पाटील गहाणे, उपसरपंच रामकृष्ण बनकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश नाकाडे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत घाटबांधे, ग्रामपंचायत सदस्य अरुण मस्के, पोलीस उपनिरीक्षक शेख, विनोद गहाणे, विद्यार्थी संघटक प्रमुख अभिजित मशीद, सुशील गहाणे, उद्योगपती घनश्याम धामट उपस्थित राहणार आहेत. या रक्तदान शिबिरासाठी स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी, शिवसेना शाखा सदस्य, पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांचा सहभाग आहे. रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान करून महादान करावे, असे आवाहन ‘लोकमत’ तालुका प्रतिनिधी संतोष बुकावन, राधेश्याम भेंडारकर, केशोरीचे लोकमत प्रतिनिधी चरण चेटुले, प्रकाश वलथरे, केशोरी सखी मंच संयोजिका रजनी झोडे यांनी केले आहे.

..................

चांदोरी खुर्द येथे रक्तदान शिबिर १८ रोजी

तिरोडा : स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ जुलैपासून लोकमत रक्ताचं नातं उपक्रमातंर्गत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे. या अंतर्गत तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य १८ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी सहभागी रक्तदान महादान करावे,असे आवाहन लोकमतचे तालुका प्रतिनिधी डी. आर. गिरीपुंजे, विजय खोब्रागडे, हुपराज जमाईवार, हितेंद्र जांभुळकर, हितेश रहांगडाले यांनी केले आहे.

Web Title: Blood donation camp at Keshori today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.