रक्तदान जगातील सर्वात श्रेष्ठ दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:31 AM2021-09-25T04:31:07+5:302021-09-25T04:31:07+5:30
गोंदिया : रक्तदानाने समाजात सद्भाव निर्माण होतो. तसेच रक्तदानातूनच एखाद्याचा जीव वाचविता येतो. यामळेच रक्तदान हे जगातील सर्वात श्रेष्ठ ...
गोंदिया : रक्तदानाने समाजात सद्भाव निर्माण होतो. तसेच रक्तदानातूनच एखाद्याचा जीव वाचविता येतो. यामळेच रक्तदान हे जगातील सर्वात श्रेष्ठ दान असल्याचे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
भारतीय जनता पक्ष शहर व तालुकाच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त येथील बाई गंगाबाई रुग्णालयात आयोजित फळ वाटप व रक्तदान शिबिरात ते बोलत होते. पुढे बोलताना अग्रवाल यांनी, नरेंद्र मोदी यांनी एकता व सदभाव निर्माण करून अनेक प्रलंबित प्रश्न सोडविले. आज प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये वार्षिक आर्थिक मदत व गरजूंना घरकुल दिले जात आहेत. कोरोनामुळे गरिबांना नोव्हेंबरपर्यंत मोफत रेशन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष केशव मानकर, अशोक चौधरी, दीपक कदम, रमेश कुथे, धनलाल ठाकरे, सुनील केलनका, भावना कदम, माधुरी हरिणखेडे, अर्जुन नागपूरे, मनोज मेंढे, सत्यम बहेकार, संजय टेंभरे, तिजेश गौतम, संदीप रहांगडाले, पारस पुरोहित, सुमित महावत, निर्मला मिश्रा, गजेंद्र फुंडे, अमृत इंगळे, मनोहर आसवानी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.