बाबूजींच्या जयंतीला रक्तदानासाठी पुढाकार

By admin | Published: July 4, 2015 02:10 AM2015-07-04T02:10:32+5:302015-07-04T02:10:32+5:30

लोकमत समूहाचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि माजी मंत्री स्व.जवाहरलाल दर्जा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त ...

Blood donation initiative for Babuji's birth anniversary | बाबूजींच्या जयंतीला रक्तदानासाठी पुढाकार

बाबूजींच्या जयंतीला रक्तदानासाठी पुढाकार

Next

लोकमतचा उपक्रम : गोंदिया पब्लिक स्कूल व गंगाबाई रूग्णालयाचे सहकार्य
गोंदिया : लोकमत समूहाचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि माजी मंत्री स्व.जवाहरलाल दर्जा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि.२) गोंदिया पब्लिक स्कूल येथे रक्तदान शिबिर पार पडले. शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी बाबुजींच्या स्मरणार्थ रक्तदान करून सामाजिक बांधिलकी दाखविली.
कार्यक्रमाची सुरूवात बाबुजींच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलनाने झाली. उद्घाटन गोंदिया पब्लिक शाळेचे व्यवस्थापक प्रफुल्ल वस्तानी यांच्या हस्ते, प्राचार्य नितू अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून बाई गंगाबाई रक्तपेढीच्या रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, प्राचार्य लुसी नायर उपस्थित होते.
गोंदिया पब्लिक शाळेचे व्यवस्थापक प्रफुल्ल वस्तानी यांनी सदर उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबुजींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. अनेकांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतला. रक्तदान करण्यासाठी लोकमतचे जाहिरात प्रतिनिधी अतुल कडू, प्रसार प्रतिनिधी पंकज धमदार यांच्यासह अश्विन नेवारे, ध्रुव रायगुडिया, सुप्रिया बागडे, सिद्धी कटरे, राजेश सोनवाने, कुशल बागडे, ग्रिस कोरे, विलास नरोती, लक्ष्मी गडपाल, राधा मेश्राम, छोटेलाल पटले, क्रिष्णा मोहन, राधेश्याम, अनिता हलानी, दिलीप तुप्पट, एस.एस. राठोड, रूपेश मेंढे, मालिनी मिश्रा, विजेंद्र दमाहे, हिरामन भुरे, दीपाल पांडे, प्रशांत गुर्वे, सचिन ब्राह्मणकर, मोहसीन शेख, राजेश नक्षिणे, जितेश येरणे, गुलाब, प्रणयकुमार तसेच अनेकांनी पुढाकार घेतला. सर्व रक्तदात्यांना अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र, डोनर कार्ड व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
संचालन लोकमत युवा नेक्स्टच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत यांनी तर आभार बालविकास मंचचे जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा लघु जाहिरात प्रतिनिधी राजू फुंडे, वर्षा भांडारकर, प्रमोद गुडधे, विनोद बन्सोड, दर्पण वानखेडे, राजेश लांजेवार, राकेश भांडारकर, गोंदिया पब्लिक स्कूलचे कर्मचारी व गंगाबाई रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
‘लोकमत’च्या सामाजिक उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक
यावेळी बाबूजींंचा सामाजिक दृष्टीकोण आणि लोकमतचे सामाजिक दायित्व याबद्दल सांगताना मनोज ताजने यांनी बाबुजींच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडले. तसेच एक स्वातंत्र्य सेनानी, राज्याचे विविध खात्यांचे मंत्री या नात्याने त्यांनी दिलेले योगदान आणि लोकमतने वेळोवेळी जपलेला सामाजिक वसा याबद्दलची माहिती दिली.
डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी, रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. प्रत्येक नागरिकाने सहभागी होवून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. लोकमतने बाबुजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करणे कौतुकास्पद आहे. प्रत्येक १८ वर्षांवरील निरोगी व्यक्ती वर्षातून चार वेळा रक्तदान करु शकतो. प्रत्येकाने यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
गोंदिया पब्लिक स्कूलच्या सचिव इंदिरा सपाटे यांनी रक्तदानामुळे आपल्याला दुसऱ्यांचे जीव वाचविण्यासाठी मदत केल्याचे समाधान मिळते. प्रत्येकाने रक्तदान करून असे पुण्यकर्म करावे असे आवाहन करून बाबुजींच्या जयंतीनिमित्त लोकमतने आयोजित केलेला सदर उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

Web Title: Blood donation initiative for Babuji's birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.