निळया आकाशाखाली होते आयुष्याची संध्याकाळ

By Admin | Published: July 2, 2014 11:20 PM2014-07-02T23:20:57+5:302014-07-02T23:20:57+5:30

जन्म उघड्यावर, संसार उघड्यावर आणि मरणही उघड्यावरच होणाऱ्या मेंढपाळांच्या समस्या पिढयान्पिढ्या 'जैसे थे' आहेत. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत वितभर पोटासाठी रानावनात व गावोगावी

Blue was under the sky, the evening of life | निळया आकाशाखाली होते आयुष्याची संध्याकाळ

निळया आकाशाखाली होते आयुष्याची संध्याकाळ

googlenewsNext

व्यथा मेंढपाळांची : सुविधांपासून वंचित, भटकंती करून उदरनिर्वाह
नरेश रहिले - गोंदिया
जन्म उघड्यावर, संसार उघड्यावर आणि मरणही उघड्यावरच होणाऱ्या मेंढपाळांच्या समस्या पिढयान्पिढ्या 'जैसे थे' आहेत. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत वितभर पोटासाठी रानावनात व गावोगावी फिरणाऱ्या मेंढीपालन करणाऱ्या लोकांची केवीलवाणी हाक शासनही ऐकत नाही.
अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी व्यक्ती धडपड करतो व तो कुठे कमी पडल्यास शासनही मदत करते. परंतु गुजरातच्या भूज जिल्ह्यातील कच्छ परिसरातील शेकडो मेंढीपालन करणारे कुटुंब पिढ्यान पिढ्यांपासून गोंदिया जिल्ह्यात वनवन भटकत आहेत. गुजरातमध्ये दुष्काळ पडल्यामुळे ते शेकडो कुटुंब आपल्या शेळ्या-मेंढ्या, उंट घेऊन महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ प्रदेशाकडे आले. तेव्हापासून आतापर्यंत ते गोंदिया जिल्ह्यात मेंढीपालनाचा व्यवसाय करून आपली उपजीविका चालवितात. मेंढीपासून निघणारी लोकर विकून आपला संसार चालविण्याचा त्यांचा खटाटोप आहे. परंतु एक डेरावाल्याला मेंढीच्या एका कळपापासून अवघी एक ते दीड क्विंटल लोकर मिळते. तीन हजार रुपये क्विंटलप्रमाणे त्याची विक्री करतात.
एका डेरावाल्याला एक ते दीड क्विंटल लोकर मिळत असल्याने तीन महिन्यात तीन ते साडेतीन हजार रुपये त्यांना मिळतात. एका वर्षात एका मेंढीचे केस कापले जाते. एका मेंढीपासुन एक पाव ते अर्धा किलो वजनाचे केस निघतात. त्यातून मिळणाऱ्या अल्पशा मोबदल्यातून गहू, तेल, मीठ, तिखट अश्या सर्वच वस्तु त्यांना खरेदी कराव्या लागत असल्याने या मेंढीपालन करणाऱ्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.
त्यांच्याजवळ इंधनाची सोय नसल्याने कच्च्या दुधाचे सेवन करावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात पावसाची रिपरिप किंवा मुसळधार पाऊस असला तर एक पोळी तयार करायला चार-चार तास लागतात असे तेथील महिलांनी सांगितले. एका कुटुंबात चार ते १५ जणांचा समावेश असून मेंढीचे दूध व लोकरपासून मिळणाऱ्या पैशावर आपला उदरनिर्वाह चालविण्याचा खटाटोप या मेंढीपालन करण्यांचा असतो.
गव्हाची पोळी, मेंढीचे दुध,ताक व भाजी हे त्यांचे मुख्य खाद्य पदार्थ आहे. पावसाळ्यात रॉकेल उपलब्ध राहात नसल्याने इंधनाची सोय म्हणून वाहनाचे टायर स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापरतात. टायर जाळल्यावर निघणाऱ्या कार्डन डायआॅक्साईडमुळे अनेक महिला आजारीही पडतात. पावसात टायर भिजले तर पावसाळ्यात जेवणही त्यांच्या नशीबात येत नाही. भारतात राहतात परंतु मतदानाचा हक्क नाही, रेशन कार्ड नाही, शासनाच्या सर्व योजनांपासून मुकलेली ही जमात पिढ्यान पिढ्यांपासून वनात भटकत किंवा गावाच्या शेजारी डेरा टाकून आपला व्यवसाय चालवित आहे.
जन्मापासून तर मरणापर्यंत महाराष्ट्रात राहणारी ही जमात उपेक्षित आहे. रानावनात आपल्या मेंढया चारून पठारावर आपला डेरा ठोकून रात्र दोन रात्री काढणाऱ्या या शेकडो कुटुंबाना निवाऱ्याची सोय नाही. उघड्या मैदानावर तंबू उभारून रात्र घालविणाऱ्या या शेकडो कुटुंबांना कायमस्वरूपी छत मिळण्यासाठी आजपर्यंत कोणीही पुढाकार घेतलेला नाही.

Web Title: Blue was under the sky, the evening of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.