मृतदेहांनाही सोसाव्या लागतात यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 09:00 PM2018-07-29T21:00:06+5:302018-07-29T21:00:38+5:30

जीवंतपणी झाले ते झाले मात्र मरणानंतर तरी शरिराचे हाल होऊ नये अशी सर्वांचीच अपेक्षा असते. मात्र येथील केटीएस रूग्णालयातील शवागारात (मर्च्युरी) मृतदेहांनाही यातना सोसाव्या लागत असल्याचे प्रकार घडत आहेत.

The bodies also have to be tormented | मृतदेहांनाही सोसाव्या लागतात यातना

मृतदेहांनाही सोसाव्या लागतात यातना

Next
ठळक मुद्देशवागारातील फ्रीजर नादुरूस्त : व्यवस्थेच्या दृष्टीने प्रयत्नच नाहीत
<p>लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जीवंतपणी झाले ते झाले मात्र मरणानंतर तरी शरिराचे हाल होऊ नये अशी सर्वांचीच अपेक्षा असते. मात्र येथील केटीएस रूग्णालयातील शवागारात (मर्च्युरी) मृतदेहांनाही यातना सोसाव्या लागत असल्याचे प्रकार घडत आहेत. मृतदेहांना सुरक्षीत ठेवण्यासाठी असलेले फ्रीजर नादुरूस्त असल्यामुळे मृतदेहांचेही हाल होत आहेत. मात्र व्यवस्थेच्या नावावर केटीएस रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून काहीच प्रयत्न होत नसल्याचे दिसत आहे.
गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आल्यापासून अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्यात भडके उडू लागले आहेत. रूग्णालयाच्या विषयांना घेऊन दोघांत तनातनी दिसते. केटीएस रूग्णालयातील शवागार व्यवस्थेतील सुधाराच्या नावावरही दोघांत वातावरण तापलेले आहे. अशात दुरूस्ती तर काही होत नाही उलट शवागारात येणाऱ्या मृतदेहांनाही यातना सोसाव्या लागत आहेत.
मागील काही दिवसांपुर्वी नवेगावबांध येथील एक मृतदेह सुरक्षीत ठेवण्यासाठी येथील केटीएस रूग्णालयातील शवागारात पाठविण्यात आले होते. दोन दिवस ठेवल्यानंतर मात्र मृतदेह ठेवण्यासाठी आनाकानी केली जात असल्याची माहिती आहे. शवागारातील फ्रीजर नादुरूस्त असूनही तो मृतदेह येथेच ठेवण्यात आला. याबाबत वैद्यकीय महाविद्यालयातील प्रभारी अधिष्ठाता डॉ. वी.पी.रूखमोडे यांना विचारणा केली असता त्यांनी फ्रीजर नादुरूस्त असल्याचे सांगत याबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक खरी माहिती देणार असे सांगीतले.
माहितीनुसार, केटीएस रूग्णालयात मृतदेह सुरक्षीत ठेवण्यासाठी चार फ्रीजरची व्यवस्था आहे. मात्र चारही फ्रीजरचे तळ खराब झाल्याने रूग्णालयातील कर्मचारी मृतांच्या नातेवाईकांना बर्फाच्या लादीची व्यवस्था करण्यासाठी सांगतात. मात्र त्यानेही काहीच होत नसून फ्रीजरची व्यवस्था नसल्याने मृतदेहांचे हालच होत आहेत.
जबाबदारीला घेऊन टोलवा-टोलवी
शवागारच्या दुरूस्तीला घेऊन काय प्रयत्न केल जात आहेत याबाबत जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, हे त्यांचे काम नसल्याचे स्पष्ट सांगीतले. रूग्णालयाची पुर्ण व्यवस्था वैद्यकीय महाविद्यालयाकडे देण्यात आली आहे. यामुळे आता अधिष्ठाताच काही करू शकतील असे त्यांचे म्हणणे आहे. तर अधिष्ठाता डॉ. रूखमोडे यांनी रूग्णालयाचा कारभार जिल्हा शल्य चिकीत्सकांकडे असल्याने तेच याबाबत सांगू शकतील असे सांगीतले.

Web Title: The bodies also have to be tormented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.