खेळामुळे शरीर सुदृढ व निरोगी राहते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:22 PM2018-12-18T23:22:56+5:302018-12-18T23:23:17+5:30

ग्रामीण भागात प्रौढ कबड्डी स्पर्धेची धूम राहात होती. एकेकाळी या स्पर्धांची सर्वच वाट बघत होते. मात्र मागील काही वर्षांत या स्पर्धांचे आयोजन थांबले. परिणामी ग्रामीण भागातील खेळाडू या खेळांपासून वंचित राहू लागले. युवकांना खेळासाठी प्रोत्साहित करण्याचे माझे सतत प्रयत्न असतात.

The body keeps the body healthy and healthy | खेळामुळे शरीर सुदृढ व निरोगी राहते!

खेळामुळे शरीर सुदृढ व निरोगी राहते!

googlenewsNext
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : कारंजा येथील आमदार चषक कबड्डी प्रौढ स्पर्धेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामीण भागात प्रौढ कबड्डी स्पर्धेची धूम राहात होती. एकेकाळी या स्पर्धांची सर्वच वाट बघत होते. मात्र मागील काही वर्षांत या स्पर्धांचे आयोजन थांबले. परिणामी ग्रामीण भागातील खेळाडू या खेळांपासून वंचित राहू लागले. युवकांना खेळासाठी प्रोत्साहित करण्याचे माझे सतत प्रयत्न असतात. खेळामुळे शरीर सुदृढ व निरोगी राहते. तर पारंपरिक खेळातून युवकांना खेळाप्रती प्रोत्साहन मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम कारंजा येथे आयोजित आमदार चषक प्रौढ कबड्डी स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेचा शुभारंभ आमदार अग्रवाल यांच्या हस्ते देवी सरस्वती व हनुमानाची पूजा करून केला. तसेच ग्राम कारंजा येथील जय भोले व राणी अवंतीबाई क्लबमध्ये सामना घेऊन सुरूवात करण्यात आली. यात जय भोले क्लबने बाजी मारून या स्पर्धेला सुरूवात झाली.
आमदार अग्रवाल म्हणाले, नोव्हेंबर-डिसेंबर हे महिने खेळांसाठी पोषक राहत असून जिल्ह्यात याच काळात कित्येक स्पर्धांचे आयोजन केले जाते. शिवाय, या काळात शाळांतील वार्षिकोत्सव असतात. अशात मात्र ग्रामीण भागातील कबड्डीला कोठेच स्थान मिळत नाही व त्यामुळे ग्रामीण युवा निराश राहतात. ग्रामीण भागातील पारंपारीक खेळाला वाव देण्यासाठीच आम्ही या आमदार चषक प्रौढ कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे सांगीतले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांनी, शरीर सुदृढ ठेवण्यासाठी खेळांचे अत्यधीक महत्व आहे. त्यात आनंदाची बाब अशी की, आमदार अग्रवाल यांनी या स्पर्धांच्या माध्यमातून युवा आपली प्रतिभा दाखविण्यासाठी मंच उपलब्ध करवून दिल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, योगराज उपराडे, स्नेहा गौतम, संजय बडोले, शुद्धोधन शहारे, अशोक लिचडे, अशोक इटानकर, दादू ठाकरे, सुनिता सवालाखे, मुकेश लिल्हारे, जीवन बंसोड, लिखीराम बन्नाटे, बालचंद ब्रम्हपुरे, वनमाला बडोले, रेवंता मडावी, गीता उके, भाविका रंगारी, सुनिता उईके, सुनिता नागपुरे, महादेव ताराम, गजानंद नागपुरे, महेंद्र सहारे, जयचंद पारधी, जीवन चव्हाण, मारोती भिमटे, गंगाराम बावनकर, श्याम कावरे, अभिजीत रामटेके यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक व गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
भविष्यात विविध स्पर्धांचे आयोजन
१७ ते २५ तारखेपर्यंत सर्व १४ जिल्हा परिषद क्षेत्रात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद क्षेत्रांतील विजेता संघांत क्वार्टर फायनल, सेनी फायनल व फायनल सामने खेळले जाणार आहेत. विशेष म्हणजे, भविष्यात आखणीही स्पर्धांचे आयोजन केले जाणार असल्याची घोषणा आमदार अग्रवाल यांनी या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी केली.

Web Title: The body keeps the body healthy and healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.