चिमुकल्यांची होणार ‘बॉडी ‘स्कॅनिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:25 AM2018-07-04T00:25:26+5:302018-07-04T00:26:19+5:30

कुपोषण मुक्तीसाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असतानाच आता यांतर्गत चिमुकल्यांच्या ‘बॉडी स्कॅनींग’चा प्रयोग केला जाणार आहे. यातंर्गत आढळणाऱ्या तिव्र कुपोषित बालकांना बाल विकास केंद्रात (व्हीसीडीसी) दाखल केले जाणार असून त्यांना ईमाइलेज रिच फूड (एमएफआर) दिले जाणार आहे.

Bodyguard will be 'body scanning' | चिमुकल्यांची होणार ‘बॉडी ‘स्कॅनिंग’

चिमुकल्यांची होणार ‘बॉडी ‘स्कॅनिंग’

googlenewsNext
ठळक मुद्देकुपोषण नियंत्रणासाठी प्रयोग : तीव्र व अतितीव्र बालकांना पुनर्वसन केंद्रात टाकणार

नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कुपोषण मुक्तीसाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असतानाच आता यांतर्गत चिमुकल्यांच्या ‘बॉडी स्कॅनींग’चा प्रयोग केला जाणार आहे. यातंर्गत आढळणाऱ्या तिव्र कुपोषित बालकांना बाल विकास केंद्रात (व्हीसीडीसी) दाखल केले जाणार असून त्यांना ईमाइलेज रिच फूड (एमएफआर) दिले जाणार आहे.
महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पारखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपोषणावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची प्रशिक्षण घेतलेली चमू कुपोषित बालकांच्या संपूर्ण शरीराची स्कॅनिंग करून बालकांच्या प्रकृतीची (उंची व वजन) माहिती घेतील. यासाठी पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
या पर्यवेक्षकांच्या माध्यमातून अंगणवाडी पर्यवेक्षिका, बाल प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), बाल अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
तर गावस्तरावर आंगणवाडी सेविका व सहायिका यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यानंतर स्कॅनिंग प्रक्रिया केली जाणार आहे. कुपोषित बालकांना एक महिन्यासाठी अंगणवाडीत ठेवले जाणार आहे. तेथे त्यांना गहू, मूंग व सोयाबीनच्या मिश्रणातून तयार केलेला ‘एमएफआर’ दिला जाणार आहे. मध्यम तीव्र श्रेणी (मॅम) व अतितीव्र श्रेणीतील (सॅम) बालकांना २१ दिवसांसाठी न्यूट्रेशिन रिहबेट सेंटर (एनआरसी) व चाईल्ड ट्रीटमेंट सेंटर (सीटीआर) येथे दाखल करून पौष्टीक आहारासोबत औषध दिली जाणार आहे. जिल्ह्यात गावपातळीवर ४४ व्हीसीडीसी असून यात यावेळी ४४ बालके दाखल आहेत.

३४ नवजात कमी वजनाचे
जिल्ह्यात मे महिन्यात १०३६ बालके जन्माला आलीत. यातील १०११ बालकांचे तीन दिवसांत वजन घेण्यात आले. यात ३४ बालके अडीच किलो पेक्षा कमी वजनाचे आढळले. यात सर्वात जास्त आमगाव तालुक्यतील १९,गोरेगाव सहा, सडक-अर्जुनी पाच , गोंदिया तीन व तिरोडातील एका बालकाचा समावेश आहे.

६.८४ टक्के बालके कुपोषित
जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षातील ८४ हजार ४८० बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ८३ हजार ४७२ (९८.८१ टक्के) बालकांचे वजन घेण्यात आले. यापैकी ७७ हजार ६८६ (९३.०७ टक्के) बालके सामान्य श्रेणीत आढळले. ५ हजार ७८६ (६.८४ टक्के) बालके कुपोषणाच्या श्रेणीत आढळले. यातील ४ हजार ८१९ (५.७७ टक्के) बालके कमी वजनाचे तर ९६७ (१.१४ टक्के) अतितिव्र कुपोषणाच्या श्रेणीत आढळले. ऊंचीनुसार अतितीव्र श्रेणीत (सॅम) मध्ये ९३ (०.११ टक्के) तर मध्यम तीव्र श्रेणी (मॅम) मध्ये ३२४ (०.३९टक्के) बालके आढळले. कुपोषणाच्या दोन श्रेणीत सर्वाधिक गोंदिया तालुक्यात ११३, गोरेगाव ६०, अर्जुनी-मोरगाव ५३, सालेकसा ५०, देवरी ५०, आमगाव ५०, सडक-अर्जुनी ३० व तिरोडा ११ बालकांचा समावेश आहे.

Web Title: Bodyguard will be 'body scanning'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.