इंटरनेटवरून सातबारा काढून बोगस शेतकरी नोंदणी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2022 09:23 PM2022-10-30T21:23:33+5:302022-10-30T21:24:49+5:30

जेव्हा सर्वसामान्य शेतकरी आर्थिक अडचणीत असतो तेव्हा त्या शेतकऱ्याकडून पडक्या भावाने धान खरेदी करून धान त्या बोगस शेतकऱ्यांच्या नावाने विक्री करतात; परंतु या सर्व प्रक्रियेत शातिर व्यापारी कुठेही फसत नाही. कारण या प्रक्रियेत त्याच्या नावाचा प्रत्यक्ष सहभाग कुठेच नसतो. बोगस शेतकऱ्याला पैशांचे आमिष देऊन त्याच्या नावाने धान विक्री करून त्याच्या खात्यावर बँकेत धानाची रक्कम आली की त्याच्याकडून विड्राॅल फॉर्म भरून रक्कम समोरासमोर काढायला लावतात.

Bogus farmer registration continues by removing seven bars from the internet | इंटरनेटवरून सातबारा काढून बोगस शेतकरी नोंदणी सुरूच

इंटरनेटवरून सातबारा काढून बोगस शेतकरी नोंदणी सुरूच

Next

विजय मानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : सालेकसा तालुक्यात धान खरेदीचे घोटाळे आणि कारवाई सुरू असतानाच बोगस धान विक्री करणारे व्यापारी पुन्हा सक्रिय झालेले दिसत आहेत. ज्या शेतीवर खरा शेतमालक पीक घेतो त्याला वगळून सातबारावर कुटुंबातील इतर नावांची नोंदणी असलेल्या बोगस शेतकऱ्याचे नाव सातबारा ऑनलाइन करण्याचे काम आताही बेधडकपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे.
 कुणबीटोला येथे असेच एक प्रकरण सामोर आले असून येथील शेतकरी भीमराव राजाराम भौतिक यांच्याकडे गट क्रमांक २३८ ची ०.६५०० हे. आर आणि गट क्रमांक २०९ ची ०.७४०० हे. आर शेती असून या जमिनीवर दरवर्षी खरीप हंगामात धान पीक घेतो; परंतु मागील ३ वर्षांपासून तो आपले धान विक्री करण्यासाठी सातबारा ऑनलाइन करायला जात असता त्या शेतीवर गिरोला या गावात राहत असलेल्या त्याच्या बहीण सुलोचना अनिल गजभिये यांच्या नावाने सातबारा नोंदणी करण्याचे काम त्यांच्या गावातील व्यापाऱ्याने करून टाकल्याचे प्रकरण समोरे आले आहे. 
आश्चर्य म्हणजे, ही शेती वरथेंबी पावसावर अवलंबून असून तिथे फक्त खरीप हंगामात भात लागवड केली जाते; परंतु मागील २ वर्षांपासून त्या शेतीवर उन्हाळी धान पीक घेतल्याचे दाखवून रबी हंगामात धान विक्री करण्यात आली आहे. या शेतकऱ्याच्या बहिणीचे लग्न होऊन ३० वर्षे लोटून गेले आहेत. 
त्यांनी आपल्या बहिणीला शेतीचा वाटासुद्धा दिलेला आहे. तरीपण गावातील व्यापारी बोगस धान विक्री करण्यासाठी तिच्या नावाने भावाच्या मालकीच्या जमिनीवर दरवर्षी सातबारा ऑनलाइन करून घेतो. अशा प्रकारे आपले धान विक्री करून बोनसची रक्कम मिळाल्यावर तिला थोडी रक्कम देऊन खूष करतो.
व्यापाऱ्याच्या या शातिरपणामुळे जमिनीचा खरा शेतमालक शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर  धान विक्रीपासून वंचित राहतो. यासंबंधात मागील वर्षी तक्रार केली असूनसुद्धा संबंधित विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. 
मार्केटिंग फेडरेशनकडे काही शेतकरी गेले असता तेथील अधिकाऱ्यांनी ज्यांच्या नावाने सातबारा ऑनलाइन केला आहे त्यांच्यासोबत बोला, असे म्हणत परत करण्याचे काम केले; परंतु मार्केटिंग फेडरेशनने अशा तक्रारीवर चौकशी करून बोगस सातबारा ऑनलाइन करणाऱ्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखविली नाही.

तलाठ्यांकडून मिळालेल्या सातबाराची नोंदणी व्हावी 
- इंटरनेटवरून ऑनलाइन सातबारा काढून व्यापारी बोगस शेतकऱ्यांच्या नावाने ऑनलाइन करून टाकतात. एकदा ऑनलाइन झाले की संबंधित खऱ्या शेतकऱ्यांनी तक्रार केली तरी मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी नाव बदलता येत नाही असे सांगून खऱ्या शेतकऱ्याला निराश करण्याचे काम मागील काही वर्षापासून करीत आले आहेत. मार्केटिंग फेडरेशनने अतिशय सक्तीचे नियम लावून खऱ्या शेतकऱ्याकडून तलाठ्यांच्या सहीने काढलेला सातबारा स्वीकार करून ऑनलाईन करण्याची व्यवस्था करावी. तसेच सातबारा ऑनलाइन करण्याचे काम एका विशिष्ट ठिकाणी किंवा संबंधित धान खरेदी केंद्रावरच करण्यात यावे. तेही संबंधित तलाठ्याच्या सील-शिक्का व तारीख बघूनच ऑनलाईनसाठी स्वीकार करावा. तसेच ज्या बोगस शेतकऱ्यांच्या नावाने सातबारा ऑनलाइन झाला असेल त्याची तक्रार आल्यावर त्याची ऑनलाईन नोंदणी रद्द करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत. यावर मार्केटिंग फेडरेशन विचार करणार काय हे पाहावे लागेल.

बोगस ऑनलाइन करून व्यापारी बनतो इमानदार
- तालुक्यात अनेक व्यापारी असे आहेत की ते इंटरनेटवरून ऑनलाइन सातबारा काढून त्या आधारावर धान विक्रीसाठी ऑनलाइन शेतकरी नोंदणी करून टाकतात. जेव्हा सर्वसामान्य शेतकरी आर्थिक अडचणीत असतो तेव्हा त्या शेतकऱ्याकडून पडक्या भावाने धान खरेदी करून धान त्या बोगस शेतकऱ्यांच्या नावाने विक्री करतात; परंतु या सर्व प्रक्रियेत शातिर व्यापारी कुठेही फसत नाही. कारण या प्रक्रियेत त्याच्या नावाचा प्रत्यक्ष सहभाग कुठेच नसतो. बोगस शेतकऱ्याला पैशांचे आमिष देऊन त्याच्या नावाने धान विक्री करून त्याच्या खात्यावर बँकेत धानाची रक्कम आली की त्याच्याकडून विड्राॅल फॉर्म भरून रक्कम समोरासमोर काढायला लावतात. त्यातील थोडीफार रक्कम देऊन सर्व रक्कम आपल्या खिशात टाकतो. अशा प्रकारे एक व्यापारी शेकडो लोकांकडून पैसे घेतो. या प्रकरणाची चौकशी झाली तर त्या व्यापाऱ्याचे काहीच बिघडत नसून ज्याच्या नावाने धान विक्री केले त्याचीच विचारपूस होऊ शकते. त्यामुळे बोगस कामे करणारा व्यापारी निश्चिंत असतो.

 

Web Title: Bogus farmer registration continues by removing seven bars from the internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.