कावडयात्रेत ‘बम भोलेचा’ गजर
By admin | Published: August 14, 2016 02:07 AM2016-08-14T02:07:11+5:302016-08-14T02:07:11+5:30
तालुक्यातील ग्राम हलबीटोला येथील त्रिलोकेश्वर धाम मंदिर सत्संग समितीच्यावतीने श्रावण मासाचे निमित्तसाधून काढण्यात आलेल्या ...
सालेकसा : तालुक्यातील ग्राम हलबीटोला येथील त्रिलोकेश्वर धाम मंदिर सत्संग समितीच्यावतीने श्रावण मासाचे निमित्तसाधून काढण्यात आलेल्या कावडयात्रेत बम भोलेच्या गजराने संपूर्ण सालेकसा परिसर शिव भक्तीत रंगलेला दिसून आला.
हलबीटोला येथील पहाडीवर स्थित त्रिलोकेश्वर धाम मंदिरातून कावडयात्रा प्रारंभ करण्यात आली. जांभळी जवळील नाल्यातील जल घेऊन तेथून सर्व कावडींंची परतीच्या वेळी शोभायात्रा काढण्यात आली. जुना सालेकसा, मुरुमरोड, सालेकसा, आमगावखुर्द अशा मुख्य मार्गाने प्रवेश करीत शोभायात्रेने नगर भ्रमण केले. सुमारे १० किलोमीटर भ्रमण करीत त्रिलोकेश्वर धाम मंदिरात कावडयात्रा आल्यावर शिवलिंग आणि त्रिफळा त्रिशुलाच्या शिवालयात स्थापित द्वादश ज्योतिर्लिंगाला जलाभिषेक करण्यात आला. या कावडयात्रेत हलबीटोला, सालेकसा, मुरुमटोला, आमगाव खुर्द येथील शेकडोंच्या संख्येत महिला, पुरुष, मुले-मुली व अबालवृद्ध सहभागी झाले. कावडयात्रेसाठी समितीचे अध्यक्ष दुलीचंद क्षीरसागर, सचिन दिवाकर भेंडारकर, कैलास अग्रवाल, गणेश वलथरे, डॉ. श्यामसुंदर राठी, सुधीर भेंडारकर, गौरीशंकर भेंडारकर, सोहन क्षीरसागर, पवन चुटे, चैनलाल नाईक, पवन कुंभडे, हेमलता नाईक आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)