आदर्श वाचनालयात ग्रंथ प्रदर्शनी व देशभक्ती पोस्टर स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:35 AM2021-08-18T04:35:14+5:302021-08-18T04:35:14+5:30
राजा राममोहनराय प्रतिष्ठान कोलकाता व ग्रंथालय संचालक मुंबई यांच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन सुनील पडोळे यांच्या अध्यक्षतेत ...
राजा राममोहनराय प्रतिष्ठान कोलकाता व ग्रंथालय संचालक मुंबई यांच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन सुनील पडोळे यांच्या अध्यक्षतेत संचालक ललित मानकर यांनी केले. याप्रसंगी देशभक्तांच्या जीवनावर पोस्टर स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यवाह विनायक अंजनकर यांनी अमृतमहोत्सवाबद्दल आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी शहिदांबद्दल याप्रसंगी मार्गदर्शन केले. मंचावर उपाध्यक्ष कुंजबिहारी शर्मा, संचालक होमेंद्र पटले, संचालिका प्रा. योगीता हलमारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात पोस्टर स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी ग्रंथपाल जगदिश बडगे, कर्मचारी शहारे, संजय राऊत आणि अभ्यासिकेतील विद्यार्थी विलास ब्राम्हणकर, चेतन गौतम, वीर मालाधरी, रोहित वट्टी, महेंद्र हत्तीमारे, मनीषा ब्राम्हणकर, प्राची मस्के, प्रशिका रंगारी, ग्रथाली बडगे यांनी सहकार्य केले.