बोपाबोडीतील ४० हेक्टर रोपवन झाले राख

By admin | Published: June 11, 2017 01:08 AM2017-06-11T01:08:24+5:302017-06-11T01:08:24+5:30

वृक्षसंवर्धनासाठी शासनाचा आटापिटा सुरू आहे तर दुसरीकडे त्या वनांच्या संवर्धनासाठी असलेले

Bopabodi 40 hectare ropavan is made ash | बोपाबोडीतील ४० हेक्टर रोपवन झाले राख

बोपाबोडीतील ४० हेक्टर रोपवन झाले राख

Next

फायर लाईन जाळली नव्हती: १०० मजुरांची बोगस मजुरी काढली
बबलू मारवाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सौंदड : वृक्षसंवर्धनासाठी शासनाचा आटापिटा सुरू आहे तर दुसरीकडे त्या वनांच्या संवर्धनासाठी असलेले वनाधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याने वनांची राखरांगोळी होत आहे. बोपाबोडी येथील ४० हेक्टर रोपवन याच हलगर्जीपणाचा नमुना आहे. फायर लाईनसाठी आलेला पैसा वनाधिकाऱ्यांनी आपल्या घशात टाकला. त्यामुळे बोपाबोडी येथील वनरोप आगीत स्वाहा झाले. ही आग आठवडाभरापूर्वी झाली.
सडक-अर्जुनी तालुक्याच्या बोपाबोडी रोपवनात फायर लाईनचे यंदा काम न झाल्याने जंगलाला आग लागली. परिणामी ही आग वाढत गेली. वनरक्षक विजय कागदी मेश्राम व क्षेत्र सहाय्यक बेलखोडे यांनी फायर लाईनचे पैसे गडप केल्याचा आरोप वनमजूर यादोराव विनाराम कापगते व पतीराम सदाशिव भुरे यांनी केला आहे. बोपाबोडी येथे १०० हेक्टर परिसरात रोपवन आहे. ५०-५० हेक्टरचे दोन प्लाट आहेत.
या प्लाटच्या फायर लाईनचे काम करण्यासाठी वनविभागामार्फत पैसा देण्यात आला. परंतु या ठिकाणचे फक्त ४ ते ५ हेक्टर फायर लाईनचे काम करण्यात आले. उर्वरीत लाईनचे काम करण्यात आले नाही. या फायर लाईनच्या कामावर मनुष्यबळ लावल्याची खोटी माहिती करून १०० बोगस मजुरांची मजूरी येथील वनाधिकाऱ्यांनी उचलली आहे. या कामावर १० मजूरांनी काही दिवस काम केले मात्र १८ मजूर कामावर दाखविण्यात आले.
या प्रकाराचा विरोध तेथील वनमजुरांनी केला. त्यामुळे त्या वनमजुरांना संबधीत अधिकाऱ्यांनी कामावरून काढून टाकले. १०० मजुरांची मजूरी बोगस दर्शवून २०१ रूपये रोजीच्या हिशेबाने २० हजार १०० रूपये हडपण्यात आले आहेत. मजूरांना काम न देता फायर लाईनच्या कामाचे पैसे हडपल्याने या रोपवनाला आग लागली. यात ४० हेक्टर रोपवन राख झाले. भ्रष्टाचाराचा कळस गाठणाऱ्या या अधिकाऱ्यांवरही कारवाई न झाल्याने वरिष्ट अधिकारी त्याच्यावर मेहरबान आहेत का, असा सवाल नागरिकांना होत आहे.
या आगीत कोट्यवधीचे नुकसान झाले. परंतु या नुकसनाीचा आकडा येथील अधिकाऱ्यांनी उपवन संरक्षक कार्यालयाला कळविले किंवा नाही ही बाब मात्र गुलदस्त्यात आहे.
या आगीत स्वाहा झालेल्या वनउपजाची चौकशी करून झालेला नुकसान या अधिकाऱ्यांच्या खिशातून वसूल करण्यात यावा असा सूर उमटत आहे.

क्षेत्र सहाय्यकाची बनवाबनवी
या प्रकरणासंदर्भात क्षेत्र सहाय्यक विलास बेलखोडे यांची विचारणा केली असता जंगल जळाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. मात्र वनमजूर हे प्रकरण बाहेर काढत असल्याचे ते म्हणाले. फायर लाईनचे काम झाले आहे. मी व्हाऊचर काढले आहेत. बोगस मजूर व फायर लाईनसाठी आलेला पैसा यासंदर्भात बोलणे टाळून माझी पदोन्नती झाली आहे त्या संदर्भात मला कसलेही घेणेदेणे नाही असे त्यांनी बोलून वेळकाढू धोरण राबविले.

Web Title: Bopabodi 40 hectare ropavan is made ash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.