एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्याने ७१९ विद्यार्थ्यांची एमपीएससीला दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:26 AM2021-03-22T04:26:02+5:302021-03-22T04:26:02+5:30
गोंदिया : महाराष्ट्र लोकसेवा आयोग्य (एमपीएससी) व रेल्वेची परीक्षा या रविवारी (दि.२१) एकाच दिवशी आल्याने परीक्षार्थींची अडचण होणार तसेच ...
गोंदिया : महाराष्ट्र लोकसेवा आयोग्य (एमपीएससी) व रेल्वेची परीक्षा या रविवारी (दि.२१) एकाच दिवशी आल्याने परीक्षार्थींची अडचण होणार तसेच विद्यार्थ्यांना एका परीक्षेची निवड करावी लागणार होती. त्यामुळे या परीक्षांवर परिणाम होण्याची शक्यता होती. तो अंदाज खरा ठरला. त्यामुळे एमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या एकूण १७४८ विद्यार्थ्यांपैकी १०२९ विद्यार्थ्यांनी रविवारी परीक्षा दिली.
गोंदिया येथील एकूण सहा परीक्षा केंद्रावरून एमपीएससीची पूर्व परीक्षा घेण्यात आली. यासाठी शहरातील सहा शाळांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात आले आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने परीक्षा केंद्रावर कोरोना नियमांचे पालन करून परीक्षा घेण्यात आली. कोरोना बाधित युवकांसाठी परीक्षा केंद्रावर स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. मात्र एकही विद्यार्थी कोरोना बाधित नसल्याची माहिती परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी दिली. एमपीएससी परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण १७४८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी प्रत्यक्षात सहा केंद्रावरून १०२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर तब्बल ७१९ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते. दरम्यान रेल्वेची परीक्षासुध्दा याच दिवशी असल्याने बरेच विद्यार्थी परीक्षेला गैरहजर असल्याचे बाेलल्या जाते. शहरातील सर्व सहा परीक्षा केंद्रावर शांततेत परीक्षा पार पडली.
.........
जिल्ह्यातील परीक्षा केंद्र परीक्षेसाठी केंद्रनिहाय बैठक व्यवस्था परीक्षा दिलेले विद्यार्थी
१) एस.एस. गर्ल्स विद्यालय २४० १४७
२) मनोहर म्युनिसिपल हायस्कूल २४० १४०
३) गोंदिया पब्लिक स्कूल ३१२ १७४
४) बी.एन. आदर्श विद्या मंदिर ३१२ १८५
५)गुजराती नॅशनल हायस्कूल ३६० २१९
६) राजस्थान कन्या विद्यालय २८४ १६४
.............................................................................................................................
एकूण १७४८ १०२९