दोघांचे प्रस्ताव अमान्य वर्षभरात सात जणांना केले स्थानबद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 02:51 PM2024-10-19T14:51:58+5:302024-10-19T14:53:26+5:30

Gondia : डेंजरस अॅक्टिव्हिटी करणाऱ्या ११ पैकी ९ जणांवर 'एमपीडीए'

Both proposals were invalid and seven people were placed within the year | दोघांचे प्रस्ताव अमान्य वर्षभरात सात जणांना केले स्थानबद्ध

Both proposals were invalid and seven people were placed within the year

नरेश रहिले 
लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
सराईत गुन्हेगारांना किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एम.पी.डी.ए.ची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते. मागील दोन वर्षांत तब्बल नऊ जणांवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली. दोघांचे प्रस्ताव अमान्य करणाऱ्यात आले. यंदा तब्बल सात जणांवर एमपीडीएची कारवाई केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.


महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, अवैध वाळू तस्करी करणारे, जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ म्हणजेच एम पी.डी.ए. कायदा (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटी) करणाऱ्या आरोपींवर गोंदिया पोलिस प्रशासनातर्फे एम.पी.डी.ए. कारवाई केल्यामुळे गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी, म्हणून पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या गुन्हेगारांवर आणि वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी धोकादायक गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगार व्यक्तीवर एम.पी.डी.ए. (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटी) कायद्यान्वये कारवाई केली आहे. 


खून करणे, खोटे दस्तऐवज तयार करून ठगबाजी करणे, शासकीय कामकाजात उपयोगी येणारे नकली मोहरे बनविणे, चोरी करणे, अवैध उत्खनन करून रेती चोरी करणे, अवैधरीत्या गांजा बाळगणे, गांजा विक्री करणे, दरोडा घालणे, खंडणी मागणे, अवैधरीत्या शस्त्र बाळगणे, अवैध शस्त्र पुरविणे, आदी प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.


यंदा यांच्यावर झाली एम.पी.डी.ए.ची कारवाई
मनिष उर्फ जयराम धर्मराज सेवईवार (४५) रा. बलमाटोला रायपूर ता. गोंदिया (४ एप्रिल २०२४) आदेश अरविंद रामटेके (२२) रा. गिरोला (दासगाव) ता. गोंदिया (४ एप्रिल २०२४) अनमोल महादेव घोडीचोर (४०) रा. संत सज्जन वॉर्ड तिरोडा (१२ एप्रिल २०२४) धीरज प्रकाश बरियेकर (३६) रा. संत रविदास वॉर्ड (१२ एप्रिल २०२४) शुभम पुरुषोत्तम हरदीये (२५) रा. बाजपाई वॉर्ड गोंदिया (५ जुलै २०२४) सूरज प्रकाश बरियेकर (३६) रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा (१९ सप्टेंबर २०२४) पंकज उर्फ मोनू गोविंद अग्रवाल (३६) रा. वसंतनगर गोंदिया (२६ सप्टेंबर २०२४)


सन २०२३ 
न्यायालयात पाठविले ४ प्रकरण दोन प्रकरणांत स्थानबद्ध ■ दोन प्रकरण अमान्य 
सन २०२४ 
न्यायालयात पाठविले ७ प्रकरण ७ प्रकरणांत स्थानबद्ध ०० अमान्य


"जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या गुन्हेगारांवर आणि वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी धोकादायक गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगार व्यक्त्तीवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली. यंदा सात जणांवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे." 
- गोरख भामरे, पोलिस अधीक्षक गोंदिया

Web Title: Both proposals were invalid and seven people were placed within the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.