चिनी सामानांचा बहिष्कार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 10:06 PM2017-08-06T22:06:13+5:302017-08-06T22:07:04+5:30
५ ते २० आॅगस्टपर्यंत चालणाºया राष्टÑीय स्वदेशी सुरक्षा अभियानाची सुरूवात चिनी वस्तूंची होळी व बहिष्कार रॅलीने गोंदियातून झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ५ ते २० आॅगस्टपर्यंत चालणाºया राष्टÑीय स्वदेशी सुरक्षा अभियानाची सुरूवात चिनी वस्तूंची होळी व बहिष्कार रॅलीने गोंदियातून झाली. यात चिनी वस्तूंचा बहिष्कार करणारे व स्वदेशी वस्तूंचा वापर करणारे फलक घेऊन घोषणांद्वारे जनजागृती करण्यात आली.
रॅलीची सुरूवात जयस्तंभ चौकातून करण्यात आली. ही रॅली जयस्तंभ चौक, गांधी चौक, चांदणी चौक, दुर्गा चौक, गोरेलाल चौक, श्री टॉकिज व नेहरू चौकातून पुन्हा जयस्तंभ चौकात परतली. तेथे चिनी वस्तूंचा बहिष्कार करण्याचे आवाहन करून चिनी वस्तूंची होळी करण्यात आली.
याप्रसंगी तिबेटीयन कॅम्पचे अध्यक्ष रिनझीन वांगमो, अॅड. ओमप्रकाश मेठी, देवेश मिश्रा, गौरव धोटे व अनिल जोशी यांनी देशावर आलेले चिनी संकट व चीनद्वारे भारतीय उद्योगांना समाप्त करण्याचे षडयंत्र यावर मार्गदर्शन केले. या संकटाचा सामना करण्यासाठी चीनद्वारे निर्मित राखी, गणपती, विद्युत बल्व, फटाके यांचा बहिष्कार करून या अभियानात सर्व नागरिकांनी सहभाग घेवून आपापल्या क्षेत्रात संघटीत किंवा वैयक्तीक योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.
संचालन बाळकृष्ण बिसेन यांनी केले. रॅलीत राहुल हारोडे, कैलाश हरिणखेडे, मनोहर मुंदडा, अरूफ अजमेरा, राजेंद्र बग्गा, पुष्पक जसानी, अॅड. सुमिता पिंचा, धर्मिष्ठा सेंगर, विनोद अग्रवाल, भावना कदम, अर्चना गहाणे, डॉ. राधेश्याम अग्रवाल, दिनेश पटेल, दिनेश दादरीवाल, लालू शर्मा, मनोज पारेख, आदेश शर्मा, बंडू जोशी, जय नागदेवे, गणेश अग्रवाल, होपचंद छतवानी, सुनील केलनका, दुर्गेश रहांगडाले, बंटी शर्मा, राजेश चतुर, नरेश गुप्ता, नीलम हलमारे, संजय कुळकर्णी, अजय दादरीवाल, महेश ठकरानी, जय चौरसिया, गोपाल नेचवानी, नीरज अग्रवाल, संदीप जैन, राजकुमार खंडेलवाल, प्रशांत वडेरा, संजय जैन, विजयकांत मिश्रा व विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.