व्यावसायिक शिक्षकांच्या मूल्यांकनावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:20 AM2021-06-20T04:20:26+5:302021-06-20T04:20:26+5:30
शासनाद्वारे योजनेची अंमलबजावणी न करता राज्याबाहेरच्या खासगी कंपनीला कंत्राट देऊन कमिशन कमविण्याच्या उद्देशाने या कंपनीने शिक्षण क्षेत्राचे तीनतेरा वाजविले ...
शासनाद्वारे योजनेची अंमलबजावणी न करता राज्याबाहेरच्या खासगी कंपनीला कंत्राट देऊन कमिशन कमविण्याच्या उद्देशाने या कंपनीने शिक्षण क्षेत्राचे तीनतेरा वाजविले आहेत. समग्र कार्यालय त्याचबरोबर योजनेचे मूल्यांकन करणारी त्रयस्थ संस्था मिळवून पायाभूत सुविधा पुरविण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अपहार करत आहेत. याची चौकशी केल्यास सत्य समोर येईल असे शिक्षकांचे म्हणणे आहे. कंपनी व त्यांच्यासोबत लागेबांधे असलेल्या समग्र कार्यालयाच्या बाजारीकरण धोरणामुळे योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या व्यवसाय शिक्षकांना अत्यंत हलाखीचा व अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिवाय मानसिक व आर्थिक पिळवणूक देखील होत आहे. मागील ५ वर्षांपासून काम करणाऱ्या शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण करण्यात आले असून त्यांना हतबल केले गेले आहे. कोरोना प्रादुर्भावात अत्यंत बिकट स्थितीत शिक्षकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आहे. त्यामुळे जोपर्यंत व्यवसाय शिक्षकांची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत व्यवसाय शिक्षण विषयाच्या १० वी आणि १२ वीच्या मूल्यांकन कार्यासह पुढील शैक्षणिक कामकाजावर राज्यातील सर्व शिक्षकांद्वारे बहिष्कार टाकण्यात आला आहे.