रेल्वेचे पॉवर केबल तुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 08:52 PM2018-03-11T20:52:42+5:302018-03-11T20:52:42+5:30
तिरोडा रेल्वे मार्गावर काचेवानी रेल्वे स्थानकाच्या यार्डात रेल्वेचा वीज तार (पॉवर केबल) तुटल्यामुळे रविवारी (दि.११) अनेक गाड्या प्रभावित झाल्या.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : तिरोडा रेल्वे मार्गावर काचेवानी रेल्वे स्थानकाच्या यार्डात रेल्वेचा वीज तार (पॉवर केबल) तुटल्यामुळे रविवारी (दि.११) अनेक गाड्या प्रभावित झाल्या. तर अनेक गाड्यांचा प्रवास रद्द करण्यात आला. विशेष म्हणजे, महाराष्ट्र एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेपेक्षा तीन तास उशिरा सोडण्यात आली.
काचेवानी रेल्वे स्थानकाजवळ पावर केबल तुटले. रेल्वेगाड्यांच्या योग्यरित्या परिचालनासाठी वीज तारांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असते. तार तुटल्याची घटना रविवारी (दि.११) सकाळी उघडकीस आली. त्यामुळे गाडी क्रमांक ६८७१३, ६८७१४, ६८७४३, ६८७४४ (सर्व मेमू गाड्या) व ट्रेन क्रमांक ५८८१६ रद्द करण्यात आल्या आहेत.
गोंदिया ते कोल्हापूरदरम्यान धावणारी महाराष्टÑ एक्स्प्रेसची गोंदिया रेल्वे स्थानकातून सुटण्याची वेळ सकाळी ८.२० वाजताची आहे. परंतु ही गाडी ११.४० वाजता गोंदियातून सोडण्यात आली.
वीज तार तुटल्यानंतर गोंदिया शहरात पसरलेल्या चर्चेनुसार, शालिमार एक्स्प्रेस जेव्हा गंगाझरी स्थानकात पोहोचली त्यावेळी तार तुटल्याची घटना घडली. परंतु शालिमार एक्स्प्रेस गेल्यानंतर तार तुटल्याचे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे.
ब्लॉकमुळे रेल्वे प्रवास होणार प्रभावित
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या रायपूर मंडळांतर्गत दाधापारा-उरकुरा सेक्शनदरम्यान ११, १८ व २५ मार्च तसेच १, ८, १५, २२ व २९ एप्रिल रोजी(प्रत्येक रविवारी) अप लाईन, मिडल लाईन व डाऊन लाईनवर बहुविभागीय आवश्यक कामांसाठी इंटिग्रेटेड कोरिडोर ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे सदर दिवशी काही प्रवासी गाड्यांचे परिचालन प्रभावित होणार आहे. यात ११, १८ व २५ मार्च तसेच १, १५, २२, २५ व २९ एप्रिल रोजी धावणारी (५८११७/५८११८) झारसुगडा-गोंदिया-झारसुगडा पॅसेंजर बिलासपूर-रायपूर-बिलासपूर दरम्यान रद्द राहील. २५ मार्च व १, ८, २२ व २९ एप्रिल रोजी (५८२०५) रायपूर-ईतवारी पॅसेंजर रद्द राहील. तसेच दुसºया दिवशी सोमवारी (५८२०६) इतवारी-रायपूर पॅसेंजर रद्द राहील. याशिवाय १८ व २५ मार्च आणि १, ८, १५, २२ व २९ एप्रिल रोजी (१८२३८) अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेसला रायपूर-बिलासपूर दरम्यान पॅसेंजर बनवून चालविण्यात येणार आहे.
गंतव्य स्थळापूर्वीच समाप्त होणाऱ्या गाड्या
दपूम रेल्वेच्या बिलासपूर रेल्वे मंडळांतर्गत बिलासपूर-रायगड रेल्वे स्थानकादरम्यान देखभाल-दुरूस्तीच्या कार्यासाठी १७, १८, २४, २५ व ३१ मार्च तसेच १ एप्रिल या सात दिवसांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे काही प्रवासी गाड्यांचा प्रवास प्रभावित होणार आहे.
यात (५८११७) झारसुगडा-गोंदिया पॅसेंजर १७, २४ व ३१ मार्चला झारसुगडा-बिलासपूर-झारसुगडा दरम्यान प्रत्येक शनिवारी रद्द राहील. तसेच १८, २५ मार्च व १ एप्रिलला प्रत्येक रविवारी झारसुगडा-रायपूर-झारसुगडा दरम्यान रद्द राहील. तसेच (५८११८) गोंदिया-झारसुगडा पॅसेंजर १७, २४ व ३१ मार्चला शनिवारी बिलासपूरमध्येच समाप्त करून या गाडीला बिलासपूरवरून (५८११७) झारसुगडा-गोंदिया पॅसेंजर बनवून गोंदियासाठी रवाना करण्यात येईल. १८, २५ मार्च व १ एप्रिल रोजी बिलासपूरमध्येच समाप्त करून या गाडीला बिलासपूरवरून (५८११७) झारसुगडा-गोंदिया पॅसेंजर बनवून गोंदियासाठी रवाना करण्यात येईल.
रेल्वे प्रवाशांच्या सुविधांना लक्षात ठेवून रेल्वे प्रशासनाद्वारे (१२८३४) हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसला झारसुगडा व रायगड दरम्यान प्रत्येक शनिवारी व रविवारी १७, १८, २४, २५, ३१ मार्च व १ एप्रिल रोजी पॅसेंजर बनवून चालविण्यात येईल.