जि.प.मधील युतीचा ब्रेकअप आठ दिवसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 10:29 PM2019-07-21T22:29:02+5:302019-07-21T22:29:41+5:30
एकमेकांचे विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसची मागील चार वर्षांपासून गोंदिया जिल्हा परिषदेत अभद्र युती आहे. मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगळी असून भाजपची विचारधारा ही केव्हाच काँग्रेसला मान्य नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एकमेकांचे विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसची मागील चार वर्षांपासून गोंदिया जिल्हा परिषदेत अभद्र युती आहे. मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगळी असून भाजपची विचारधारा ही केव्हाच काँग्रेसला मान्य नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसात जि.प.तील अभद्र युती तोडण्यात येईल अशी ग्वाही काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख माजी खा.नाना पटोले यांनी रविवारी (दि.२१) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, महासचिव अमर वºहाडे, विनोद जैन, के.आर.शेन्डे, डॉ.नामदेव किरसान उपस्थित होते. जि.प.ची पोटनिवडणूक पार पडल्यानंतर गोंदिया जि.प.मध्ये असलेली काँग्रेस-भाजप अभद्र युती तोडण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांनी पक्ष श्रेष्ठींना सांगितले होते.मात्र पोटनिवडणूक होवून महिनाभराचा कालावधी लोटूनही युती तोडण्यात आली नसल्याचा प्रश्न माजी खा.नाना पटोले यांना केला असता त्यांनी ही अभद्र युती पक्षाला सुध्दा मान्य नाही.येत्या आठ दिवसात जि.प.तील अभद्र युती तोडण्यात येईल असे सांगितले.
गोंदिया जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे राज्यातील सत्तारुढ भाजप सरकारने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली. सरकारने यावर त्वरीत निर्णय न घेतल्यास भाजपच्या एकाही मंत्र्याला जिल्ह्यात आणि गावात पाय ठेवू देणार नाही, या विरोधात लवकरच आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगितले.
भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकरी कर्जमाफी, बेरोजगारांना रोजगार व कल्याणकारी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते.मात्र यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तत: केली नाही. शेतकरी कर्जमाफीची घोषणा करुन तीन वर्षांचा कालावधी लोटला मात्र अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.उलट शेतकरी थकबाकीदार झाल्याने त्यांना राष्टÑीयकृत बँकाकडून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे. त्यांना १६ तास वीज देण्याची मागणीही पटोले यांनी केली.
निवडणूक लढण्याचा निर्णय पक्षावर
आगामी विधानसभा निवडणूक आपण लढणार का असा प्रश्न नाना पटोले यांना केला असता सध्या आपल्यावर पक्षाने राज्याच्या प्रचारप्रमुखाची जबाबदारी सोपविली आहे.त्यामुळे ती यशस्वीपणे पार पाडणे ही पहिली जबाबदारी आहे.पक्षाने विधानसभा निवडणूक लढण्याचे आदेश दिल्यास आपण निर्णय घेवू असे पटोले म्हणाले.