‘ब्रेथ ॲनालायझर’धूळखात; जिल्ह्यात तळीराम झोकात (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:31 AM2021-02-11T04:31:03+5:302021-02-11T04:31:03+5:30

बॉक्स आश्चर्यम्! मार्चनंतर कुणीच ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह केले नाही मार्च महिन्यानंतर कुणीच मद्यप्राशन करून वाहन चालविले नाही, असे म्हटले ...

‘Breath Analyzer’ in the dust; Taliram Zhokat (Dummy) in the district | ‘ब्रेथ ॲनालायझर’धूळखात; जिल्ह्यात तळीराम झोकात (डमी)

‘ब्रेथ ॲनालायझर’धूळखात; जिल्ह्यात तळीराम झोकात (डमी)

Next

बॉक्स

आश्चर्यम्! मार्चनंतर कुणीच ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह केले नाही

मार्च महिन्यानंतर कुणीच मद्यप्राशन करून वाहन चालविले नाही, असे म्हटले तर त्यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. मग मद्यप्राशन करून वाहन चालविण्यात आले तर पोलिसांनी कारवाई का केली नाही, असा प्रश्न सहजच पुढे येतो; परंतु कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी मद्यपी वाहन चालकांवर कारवाई झाली नाही. कारवाई करण्यासाठी ब्रेथ ॲनालायझरचा वापर होतो. यातून कोरोनाचा संसर्ग पसरू शकतो म्हणून कारवाई करण्यात आली नाही. मार्चनंतर एप्रिल ते जानेवारीपर्यंत कारवाई झालीच नाही.

कोट

वाहन चालविताना कसल्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करू नये. मद्यप्राशन केलेली व्यक्ती वाहन चालवत असेल तर तो स्वत:सह दुसऱ्याचा जीव धोक्यात टाकते. यामुळे अपघात घडण्याची शक्यता अधिक असते. वाहतूक नियमांचे सर्वांनी पालन करावे.

दिनेश तायडे, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक गोंदिया.

बॉक्स

ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह कारवाई

सन २०१९

सन २०२०

जानेवारी -१४

- १०

फेब्रुवारी-२

-३

मार्च-३३

-२

एप्रिल-२

मे-२

जून -५१

जुलै-३१

ऑगस्ट-११

सप्टेंबर -१२

ऑक्टोबर-२

नोव्हेंबर-४१

डिसेंबर-४१

......

बॉक्स

कोट्यवधींची दारू विक्री

लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री झाली. कोट्यवधींची दारू तळीरामांनी रिचवली. महिना - दीड महिनाभर दारू दुकाने बंद होती. त्यानंतर सुरू झालेल्या दारू दुकानांत गर्दी दिसून आली. त्यांच्या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा लावण्यात आली होती. तळीरामही आम्ही देशाची आर्थिक स्थिती सुधारणारे योद्धा आहोत, असे म्हणत होते.

Web Title: ‘Breath Analyzer’ in the dust; Taliram Zhokat (Dummy) in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.