लाचखोर हवालदारास रंगेहात पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:28 AM2021-03-26T04:28:55+5:302021-03-26T04:28:55+5:30

गोंदिया : जुगार प्रकरणात न अडकविण्यासाठी व धाडीत पकडलेली दुचाकी सोडण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी करून रक्कम स्वीकारणाऱ्या पोलीस ...

The bribe-taker caught the constable red-handed | लाचखोर हवालदारास रंगेहात पकडले

लाचखोर हवालदारास रंगेहात पकडले

Next

गोंदिया : जुगार प्रकरणात न अडकविण्यासाठी व धाडीत पकडलेली दुचाकी सोडण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी करून रक्कम स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत कोहमारा चौकात गुरुवारी (दि.२५) ही कारवाई करण्यात आली आहे. संजय उमाजी वडेट्टीवार (४६) असे लाचखोर हवालदाराचे नाव आहे.

तक्रारदार शेतकरी असून ते ७ मार्च रोजी शेतात कीटकनाशक फवारणीसाठी दुचाकी (एमएच ३५-एडी ११५३)ने गेले होते. यावेळी डुग्गीपार पोलिसांनी तेथे धाड घालून जुगार खेळणाऱ्यांसोबतच तक्रारदारांचीही दुचाकी उचलून पोलीस ठाण्यात जमा केली होती. यावर तक्रारदाराने बीट अंमलदार हवालदार वडेट्टीवार यांना दुचाकी सोड‌ण्यास म्हटले असता त्याने न्यायालयातून सोडवून घे असे म्हटले. त्यानंतर १८ मार्च रोजी तक्रारदाराने वडेट्टीवारला मोबाइलवर संपर्क करून दुचाकीसाठी न्यायालयात अर्ज केल्याचे सांगितले असता त्याने जुगाराच्या गुन्ह्यात अडकायचे नसल्यास व दुचाकी सोडवायची असल्यास गुपचाप दोन हजार रुपये दे असे म्हटले. तसेच २४ मार्च रोजी वडेट्टीवारने तक्रारदारास मोबाइलवरून संपर्क साधून ठाण्यात ये असे म्हटले. यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली. तक्रार पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.२५) कोहमारा चौकात सापळा लावला. यात वडेट्टीवारने पंचासमक्ष तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच घेतली असता पथकाने त्याला रंगेहात पकडले. डुग्गीपार पोलीस ठाण्यात याप्रकरणी लाप्रका १९८८ कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: The bribe-taker caught the constable red-handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.