पाच दिवसात गायी परत आणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:22 AM2021-05-29T04:22:43+5:302021-05-29T04:22:43+5:30
गोंदिया : येथील गौशालामध्ये ठेवलेल्या गायी ८ दिवसांपूर्वी नगर परिषदेच्या वतीने लिलाव करून त्यांना सोडण्यात आले. मात्र त्या गायी ...
गोंदिया : येथील गौशालामध्ये ठेवलेल्या गायी ८ दिवसांपूर्वी नगर परिषदेच्या वतीने लिलाव करून त्यांना सोडण्यात आले. मात्र त्या गायी ५ दिवसात पुन्हा गौशाळेत परत आणा अशा मागणीचे पत्र जयश्री महाकाल सेवा समितीच्या वतीने पालिकेचे मुख्याधिकारी तसेच पिंडकेपार येथील गौशाळेच्या अध्यक्षांना देण्यात आले आहे.
सविस्तर असे की, नगर परिषदेच्या वतीने रस्त्यावर फिरणाऱ्या गायींना पकडून त्या गायी पिंडकेपार येथील गौशाळेत ठेवण्यात येत होत्या. मात्र त्या गायीचे पालन-पोषण करणे कठीण होत होते. परिणामी १५ ते २० गायींचा मृत्यू झाला. त्याच अनुषंगाने गायीच्या लिलावासाठी निविदाही काढली. मात्र कुणीही निलामीसाठी पुढे आले नाही. परिणामी ८ दिवसांपूर्वी कवडमोल भावात गायींचा लिलाव करून त्या गायी सोडून देण्यात आल्या. हे प्रकरण सोशल मीडियावरही चांगलेच गाजले. दरम्यान जयश्री महाकाल सेवा समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक लोकेश यादव यांनी येत्या ५ दिवसांत पूर्ण गायी पुन्हा परत आणा तसेच यापुढे सेवा समिती त्या गायींचे पालन पोषणाची जबाबदारी घेईल, अशा आशयाचे निवेदन गौशाळा अध्यक्ष तसेच नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिले आहे.