कायद्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 10:36 PM2018-07-21T22:36:25+5:302018-07-21T22:38:37+5:30
ग्रामीण भागातील बहुतांश लोकांना कायद्याची माहिती परिपूर्ण स्वरुपात नसते. त्यामुळे त्यांचे वर्तन कायद्याचे उल्लघंन करणारे घडते. त्याकरिता सर्वसामान्य माणसापर्यंत कायद्याची माहिती पुरविणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश नितीन ढोके यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : ग्रामीण भागातील बहुतांश लोकांना कायद्याची माहिती परिपूर्ण स्वरुपात नसते. त्यामुळे त्यांचे वर्तन कायद्याचे उल्लघंन करणारे घडते. त्याकरिता सर्वसामान्य माणसापर्यंत कायद्याची माहिती पुरविणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश नितीन ढोके यांनी केले.
तालुका विधी सेवा समिती अंतर्गत दिवाणी व फौजदारी न्यायालयात शुक्रवारी (दि.२०) आयोजीत मार्गदर्शन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून अॅड. सुरेश गिºहेपुंजे, अॅड. बंसोड, अॅड.राऊत, प्रा.राजकुमार भगत, अॅड.व्ही.डी.रंगारी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविकातून अॅड. सुरेश गिºहेपुंजे यांनी ग्राहक सरक्षण कायद्याविषयी मार्गदर्शन केले. अॅड. बंसोड यांनी, लैंगिक अत्याचार कायदा २०१२ या विषयावर मार्गदर्शन केले. समाजसेवक पॅनल मेंबर प्रा. भगत यांनी ‘बेटी बचाव-बेटी पढाओ’ या विषयावर तर अॅड. राऊत यांनी मनोधैर्य योजना या विषयावर मार्गदर्शन केले. संचालन करून आभार अॅड. पोर्णिमा रंगारी यांनी मानले. कार्यक्रमासाठी सहाय्यक अधीक्षक ए.डी. जांभुरे, वरिष्ठ लिपीक न.भै.टेंभरे, ए.एम. भालेराव, कनिष्ठ लिपीक आर.एस. निकुळे, आर.डी. खोत, पी.एस. डोंगरे तसेच आर.जी. खेडकर, एस.के. साखरकर त्याचप्रमाणे न्यायालयाच्या पिएलव्ही म्हणून कार्यरत मंजुशा कोरे, मनिषा बैस, जितेंद्रसिंग मोहबंशी, डेबूजी बावणकर, शुभांगी भेंडारकर यांनी सहकार्य केले.