अवैध रेल्वे तिकीट विक्री करणारा दलाल जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 10:31 PM2019-07-21T22:31:22+5:302019-07-21T22:31:53+5:30

रेलटोलीच्या पाल चौकातील टुर्स एन्ड ट्रॅव्हल्सच्या दुकानातून रेल्वेची ई तिकिटे अवैध पद्धतीने विक्री केली जात असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली. या आधारावर रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सदर ठिकाणी धाड घालून ५७ हजार ५७९ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

The broker is selling illegal rail tickets | अवैध रेल्वे तिकीट विक्री करणारा दलाल जाळ्यात

अवैध रेल्वे तिकीट विक्री करणारा दलाल जाळ्यात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रेलटोलीच्या पाल चौकातील टुर्स एन्ड ट्रॅव्हल्सच्या दुकानातून रेल्वेचीतिकिटे अवैध पद्धतीने विक्री केली जात असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली. या आधारावर रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सदर ठिकाणी धाड घालून ५७ हजार ५७९ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी गोंदियाच्या महावीर कॉलनीतील असून राज (बदललेले नाव) असे आहे.तो मागील अनेक दिवसांपासून अवैध तिकिट विक्रीचा व्यवसाय करीत होता. रेल्वे अधिनियम कलम १४३ अंतर्गत कारवाई करण्यात आली. आरोपीने आपल्या संगणक संचात वेगवेगळ्या चार आयडी तयार केल्या होत्या. त्यात २८ तिकिट त्यांची किंमत ३५ हजार ९७९ जप्त करण्यात आल्या. १९ हजार रुपये किमतीचा संगणक संच, दोन हजार रुपये किमतीचा मोबाईल व ६०० रुपये रोख जप्त करण्यात आले.
सदर कारवाई सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय, सहायक मंडळ सुरक्षा आयुक्त ए.के.स्वामी यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक एस. दत्ता,उपनिरीक्षक एस.एस.बघेल, मुख्य आरक्षक आर.सी.कटरे व एस.बी.मेश्राम यांनी सदर कारवाई केली आहे.

Web Title: The broker is selling illegal rail tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.