भाऊ, तुम्ही किती लाख टाकले होते जी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 05:00 AM2022-05-23T05:00:00+5:302022-05-23T05:00:11+5:30

शेतीत फायदा होत नसल्याने या व्यवसायात गुंतवणूक करणे उत्तम राहील असे वाटून, मागील काही दिवसात लांजी आणि सालेकसा तालुक्यात अनेक शेतकरी आपली शेतजमीन विकायला निघाले. परंतु शेती खरेदी करणारा कोणी मिळत नसताना चिटफंड व्यवसायिकांच्या एजंटाने त्यांची शेती खरेदी केल्याचे प्रकार घडले आहेत. अनेकांनी आपल्या घरातील दागिने विकून यात पैसे गुंतवले. सराफा व्यवसायी जुने दागिने खरेदी करताना थकले.

Brother, how many lakhs did you spend? | भाऊ, तुम्ही किती लाख टाकले होते जी ?

भाऊ, तुम्ही किती लाख टाकले होते जी ?

Next

विजय मानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या मध्य प्रदेश राज्यातील लांजी तालुक्यात चालत असलेल्या चिटफंड व्यवसायात मध्य प्रदेशसह महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यातील हजारो लोकांनी तीन महिन्यात दामदुप्पट करून देणाऱ्या चिटफंड व्यवसायात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. परंतु शेवटी या व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई करत चिटफंड व्यवसाय बंद पाडला आणि रोख रकमेसह सर्व दस्तावेज ताब्यात घेतले. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्या लोकांना जबरदस्त शॉक लागला आहे. त्यांची, तेलही गेले आणि तूपही गेले, अशी परिस्थिती झाली आहे. 
अंबानी म्हणून प्रसिद्ध झालेले चिटफंड व्यवसायाचे मुख्य सूत्रधार सोमेंद्र कंकरायणेला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली असून चिटफंड व्यवसाय चालवणाऱ्या इतर सहकाऱ्यांना सुद्धा आपल्या ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोनशे कोटींची रोकड व नोटा मोजण्याचे मशीन, शेकडो धनादेश पुस्तिका आणि इतर दस्तावेज जप्त केले असून त्यांच्या चिटफंडाचा व्यवसाय बंद केला आहे. अशात आता ज्या लोकांनी आपल्या घामाची कमाई तिथे गुंतवली, ती परत मिळणार नाही असे वाटत असताना, ‘भाऊ  तुम्ही किती पैसे टाकले होते’ असा प्रश्न लोक एकमेकांना विचारत आहेत. सध्या तालुक्यात संबंधित चिटफंड व्यवसायाचीच चर्चा रंगलेली दिसत आहे.
लांजी तालुक्यातील बोलेगाव येथील युवक सोमेंद्र कंकरायणे हा विदेशातून व्यवसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतला आणि त्यांनी तीन महिन्यात दामदुप्पट देण्याचा चिटफंड व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला काही गावांपर्यंत मर्यादित असलेला हा व्यवसाय हळूहळू संपूर्ण बालाघाट जिल्ह्यात आणि त्यानंतर महाराष्ट्र व छत्तीसगड राज्यात सुद्धा पोहोचला. व्यवसायाची व्याप्ती वाढल्यानंतर त्याने आपले काही एजंट नियुक्त केले आणि व्यवसायाचे जाळे पसरवले. सालेकसा तालुक्यात लोकांचे नेहमी येणे-जाणे सुरू असते. त्यामुळे येथील लोकांच्या आणि नातेवाईकांच्या माध्यमातून हा व्यवसाय सालेकसात सुद्धा पसरला. तालुक्यातील हजारो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक या चिटफंडमध्ये केली. जेव्हा एकाने ५० हजार टाकले, तर त्याला अवघ्या तीन महिन्यांतच एक लाख रुपये मिळाले. एक लाख रुपये टाकले, तर दोन लाख मिळाले. स्वप्न वाटत असताना लोकांना जेव्हा दुप्पट रक्कम मिळू लागली, तेव्हा इतरांच्या मनात सुद्धा लालसा बळावली आणि कोणी एक, तर कोणी दोन लाख व त्यापेक्षा जास्त अशी गुंतवणूक करू लागले. 
यात काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी तर सेवानिवृत्तीचे मिळालेले सगळे पैसे त्यात टाकून दिले. एका कर्मचाऱ्याने तर तब्बल पन्नास लाख रुपये व्यवसायात गुंतवणूक केल्याचे सांगतात. धान व्यवसायिकांनी तर मोठमोठी रक्कम त्यात गुंतवणूक केल्याची चर्चा आहे. याशिवाय काही गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर छोटे-मोठे कर्मचारी आणि सूज्ञ नागरिकांनी सुद्धा मोठी रक्कम गुंतवणूक केली. अशा लोकांची गुंतवणूक पाहून शेतकरी वर्ग सुद्धा या चिटफंड व्यवसायात रक्कम टाकू लागला. अनेक शेतकऱ्यांनी आपली शेती विकून यात रक्कम टाकली आहे. 
शेतीत फायदा होत नसल्याने या व्यवसायात गुंतवणूक करणे उत्तम राहील असे वाटून, मागील काही दिवसात लांजी आणि सालेकसा तालुक्यात अनेक शेतकरी आपली शेतजमीन विकायला निघाले. परंतु शेती खरेदी करणारा कोणी मिळत नसताना चिटफंड व्यवसायिकांच्या एजंटाने त्यांची शेती खरेदी केल्याचे प्रकार घडले आहेत. अनेकांनी आपल्या घरातील दागिने विकून यात पैसे गुंतवले. सराफा व्यवसायी जुने दागिने खरेदी करताना थकले. शेवटी त्यांनी ही दागिने खरेदी बंद केली. अशात ही बाब बालाघाट जिल्ह्यातील काही राजकारणी लोकांच्या नजरेत जास्त खटकू लागली, तर जिल्हा प्रशासन सुद्धा यावर आपली नजर ठेवून बसला.

आमदारांनी मांडला विधानसभेत मुद्दा 
- दरम्यान, लांजी क्षेत्रातील काँग्रेस आमदार हिना कावरे यांनी मध्य प्रदेश विधानसभेत चिटफंड व्यवसायाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर काही दिवसात आणखी एका भाजप आमदाराने हा मुद्दा विधानसभेत  मांडला, तेव्हा शासनाने या चिटफंड व्यवसायाचा तपास करण्याचे आदेश दिले. शेवटी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मुख्य सूत्रधारासह इतर दहा जणांना अटक केली. सोबतच दोनशे कोटी रुपये रोकड, नोटा मोजण्याचे मशीन, चेकबुक व इतर दस्तावेज ताब्यात घेतले. ही कारवाई केल्यानंतर लोकांनी गुंतवणूक करणे बंद केले. 

कित्येकांनी ठेवले डोक्यावर हात 
- चिटफंड व्यवसायिकांवर कारवाई झाल्यानंतर आता ज्यांनी गुंतवणूक केली, ते डोक्यावर हात ठेवून बसले आहेत. अनेकांना तर जबरदस्त हादरा बसला आहे. कालपर्यंत काही लोक दामदुप्पट होऊन मिळेल, या आनंदात इकडे-तिकडे वावरत होते, ते आता लोकांसमोर फिरताना दिसत नाहीत. तेलही गेले आणि तूपही गेले, अशी परिस्थिती रक्कम गुंतवणूक करणाऱ्या लोकांची झालेली आहे. कारण की रक्कम गुंतवणूक करण्यासाठी लोकांनी सगळी घामाची कमाई तसेच दागिने व शेती विकून पैसे टाकले होते. आता लोक एकमेकांना हेच विचारात आहे की, ‘भाऊ, किती पैसे टाकले 

 

Web Title: Brother, how many lakhs did you spend?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.