‘बुद्ध आले दारी’ ऑनलाइन उपक्रम २० मेपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:30 AM2021-05-20T04:30:53+5:302021-05-20T04:30:53+5:30
गोंदिया : संविधान मैत्री संघ, सर्वसमाज विचार महोत्सव समिती आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध जयंतीनिमित्त २० ...
गोंदिया : संविधान मैत्री संघ, सर्वसमाज विचार महोत्सव समिती आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध जयंतीनिमित्त २० ते २६ मे दरम्यान जागृती सप्ताह ऑनलाइन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. जेणेकरून लोकांनी घरी राहून महाकारुणिक शाक्यमुनी तथागत गौतम बुद्धांची जयंती साजरी करावी.
२० मेपासून सुरू होत असलेल्या या ऑनलाइन उपक्रमात बुद्ध विचारांच्या माध्यमातून घरोघरी जनजागृती करण्याचा माणस आहे. २० मेला ‘बुद्ध विचार’, २१ मे रोजी बुद्ध गीते आणि बौद्ध कविता वाचन, २२ मेला क्राफ्ट मेकिंग आणि चित्रकला, २३ मे रोजी बौद्धदर्शन, २४ मे रोजी बौद्ध प्रश्नमंजूषा, २५ मे रोजी वृक्षारोपण व २६ मे रोजी धम्मगुरू यांचे बुद्ध संदेश मार्गदर्शन, बुद्ध वंदन-अभिवादन, बौद्ध व्हा-बौद्ध व्हा यासारखे जागृती कार्यक्रम धम्मगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली उपासक-उपासिका, अनुयायी, विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन घेतले जात आहेत. या कार्यक्रमात सर्व सहभागी स्पर्धकांना पुरस्कृत केले जाणार आहे. करिता या उपक्रमात जास्तीत जास्त लोक सहभागी होऊन घरीच बौद्ध जयंती साजरी करावी,असे आवाहन संविधान मैत्री संघ, सर्वसमाज जयंती समिती, समता सैनिक दलाच्या वतीने करण्यात आले आहे.