बौद्ध समाज सामूहिक विवाह : सोहळ््याचे १५ वे वर्ष

By admin | Published: May 13, 2017 01:40 AM2017-05-13T01:40:20+5:302017-05-13T01:40:20+5:30

येथील बौद्ध सामूहिक विवाह समिती, भारतीय बौद्ध महासभा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भिमघाट स्मारक समितीच्या

Buddhist society group marriage: 15th year of Sohal | बौद्ध समाज सामूहिक विवाह : सोहळ््याचे १५ वे वर्ष

बौद्ध समाज सामूहिक विवाह : सोहळ््याचे १५ वे वर्ष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील बौद्ध सामूहिक विवाह समिती, भारतीय बौद्ध महासभा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भिमघाट स्मारक समितीच्या संयुक्तवतीने भिमघाट येथे रविवारी (दि.७) बौद्ध समाजाचा १५ वा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ््यात १० जोडप्यांचे ‘शुभमंगल’ लावण्यात आले.
सोहळ््याच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. ए.बी.बोरकर होते. सोहळ््यात भंते बुद्धरत्न व भंते बुद्धशील यांनी पारंपारिक पद्धतीने जोडप्यांचा विवाह लावून दिला. यात तीन जोडप्यांचा आंतरजातीय विवाह लावून देण्यात आला. जोडप्यांना समितीकडून गृहोपयोगी साहीत्य व प्रमाणपत्र मंजूश्री बोरकर, पौर्णिमा वालदे, पांडूरंग गजभिये, सुशिल गणवीर यांच्या हस्ते देण्यात आले.
सोहळ््यासाठी प्रेमलाल उके, भागचंद डोंगरे, जीवन हिवरे, इंदल उके, अरूण गजभिये, कृष्णा मेश्राम, धार्मिक मेश्राम, श्याम बोरकर, सेवक बंसोड, प्रेमचंद नारनवरे, पृथ्वी भालाधरे, पुरूषोत्तम रहांगडाले, से.नी.कोल्हे, किशोर बंसोड, व्ही.एम.गजभिये, अनुनाथ भिमटे, रमेश ठवरे, एन.टी.बोरकर, हुसेन मेश्राम, सुनील भालेराव, अक्षय चव्हाण आदिंनी सहकार्य केले. या विवाह सोहळ््याला मोठ्या संख्येत बौद्ध समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: Buddhist society group marriage: 15th year of Sohal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.